प्रतिनिधी / पणजी
गंगटोकचे महानगरपालिका आयुक्त आर. बी. भंडारी यांनी गुऊवारी पणजी महानगरपालिकेला भेट दिली. त्यावेळी त्यांच्या समवेत गंगटोक मनपाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात, आयुक्त क्लेन मदेरा, उपमहापौर संजीव नाईक आदींनी भंडारी आणि त्यांच्या शिष्टमंडळातील अधिकाऱ्यांचे स्वागत केले. आपल्या या भेटीदरम्यान त्यांनी सीसीपीच्या अभिनव कचरा व्यवस्थापन प्रणालीची पाहणी केली. त्यावेळी त्यांच्यात विचारांची फलदायी देवाणघेवाण झाली. कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत पद्धतींमध्ये पणजी मनपाने साधलेल्या उत्कृष्टतेवर भंडारी आणि अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.