कुटुंबीयांसह रामलल्लाचे दर्शन घेणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान सोमवारी अयोध्येला भेट देणार आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान रविवारी संध्याकाळी कुटुंबासह दिल्लीला पोहोचले आहेत. दिल्लीतूनच दोन्ही मुख्यमंत्री कुटुंबासह अयोध्येला रवाना होतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोन्ही मुख्यमंत्री त्यांचे आई-वडील आणि पत्नीसह अयोध्येला जाऊन रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत.
रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपण कुटुंबीयांसह अयोध्येला नव्याने बांधलेल्या मंदिरात रामलल्लाचे दर्शन घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, 22 जानेवारीच्या सोहळ्याचे आमंत्रण असूनही ते अयोध्येला गेले नव्हते. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्यादिवशी केजरीवाल यांनी आपल्या पत्नीसह दिल्लीतील रोहिणी सेक्टरमधील प्राचीन श्री बालाजी मंदिरात सुंदरकांड पठणात भाग घेतला होता.