संपुर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल गुरुवार किंवा शुक्रवारी येण्याची शक्यता असतानाच या संधर्भात उद्या निकाल देण्याचे संकेत न्यायमुर्ती धनंजय चंद्रचुड दिले गेले आहे. शनिवारी आणि रविवारी कोर्टाला सुट्टी असल्याकारणाने तसेच सोमवारी या घटनापीठातील एक सदस्य निवृत्त होत असल्याने तत्पुर्वी हा निकाल येणे अपेक्षित असल्याचे कायदा तज्ञांनी सांगितले आहे.
महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा निकाल लवकरच लागणार अशा बातम्या येत असतानाच या घटनापीठाचे एक सदस्य न्यायमुर्ती एम.आर शहा हे निवृत्त होत आहे. सोमवारी त्यांचा सर्वोच्च न्यायालयातील शेवटचा दिवस असेल. त्यामुळे न्यायमुर्तींच्या निवृत्तीदिवशी शक्यतो कोणत्याही प्रकारची सुनावणी केली जात नाही. तसेच येत्या शनिवारी आणि रविवारी कोर्टाला सुट्टी असल्याने गुरुवारी किंवा शुक्रवारी या घटनापीठाचा निकाल येण्याची शक्यता होती.
दरम्यान, त्यानंतर आज सरन्यायाधिश धनंजय चंद्रचुड यांनी आज या निकालाचे संकेत दिले आहेत. उद्या आम्हाला एक महत्वाचा निकाल द्यायचा असल्याचे विधान सरन्यायाधिशांनी दिले आहे.