वार्ताहर/ काकती
काकतीत एक कोटीचा निधी खर्चून रस्ता पक्का करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. रस्त्याचे दर्जेदार काम होण्यासाठी आमदाराचे स्थानिक शिष्टमंडळ पाहणी करून मार्गदर्शन करीत आहे.
आमदार सतीश जारकीहोळी यांच्या आमदार निधीतून एक कोटीच्या निधीतून देसाई गल्लीसाठी 50 लाख रुपये, मुसलमान गल्ली, यमनापूर गल्ली 50 लाखाच्या निधीतून महिन्याभरापासून सुरुवात झाली आहे.
येथील यमकनमर्डी ब्लॉकचे अध्यक्ष सागर पिंगट यांच्या नेतृत्वाखाली जि. पं. सदस्य सिद्दगौडा सुणगार, ग्रा. पं. अध्यक्ष सुनील सुणगार, ग्रा. पं. सदस्य लक्ष्मण कोळेकर व त्यांचे शिष्टमंडळ आवश्यक मार्गदर्शक सूचना देऊन दर्जेदार रस्ते होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. रस्त्याचे कामकाज शिर्घरितीने करून लोकार्पण करण्यात येणार असल्याचे पिंगट यांनी माहिती दिली.