दोडामार्ग – वार्ताहर
ग्रामपंचायत घोटगेवाडीच्या वतीने कृषी दिनानिमित्त जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा घोटगेवाडी आणि अंगणवाडी घोटगेवाडी परीसरात झाडे लावून कृषी दिन उत्साहात साजरा उत्साहात साजरा करण्यात आला. शाळा व अंगणवाडी परिसरात अनेक प्रकारची झाडे लावण्यात आली. यावेळी सरपंच श्रीनिवास शेटकर, उपसरपंच सागर कर्पे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थीनी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.