बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समिती ग्रामीणचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांची रविवारी बेकिनकेरे गावात भव्य प्रचारफेरी काढण्यात आली. या प्रचारफेरीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रारंभी बसस्थानकाजवळील गणेश मंदिरात पूजा करून प्रचारफेरीला सुरुवात झाली. गवळी गल्ली, लक्ष्मी गल्ली, नागनाथ गल्ली, ज्योतिर्लिंग गल्ली, मारुती गल्ली, ज्ञानेश्वर नगरमार्गे प्रचारफेरी मार्गस्थ झाली. यावेळी समिती आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, लाचारी सोडा, समिती जोडा आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या प्रचारफेरीत ग्रामस्थ व तरुणवर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. यावेळी सोमनाथ सावंत, संजय सन्नी, चंद्रकांत सावंत, अजित येळ्ळूरकर, संदीप येळ्ळूरकर, उत्तम भडांगे, अनिल सावंत, रवळू सावंत, नागराज सनदी, आदेश येळ्ळूरकर, डॉ. नितीन राजगोळकर यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. निवडणुकीची रणधुमाळी अगदी जवळ आली आहे. त्यामुळे प्रचाराला वेग आला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना प्रतिसाद वाढू लागला आहे. त्यामुळे राष्ट्रीय पक्षांची झोप उडाली आहे. विविध गावांमध्ये प्रचाराला प्रतिसाद मिळत असून युवावर्ग मोठ्या संख्येने सहभागी होऊ लागला आहे. समितीच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार दाखल झाले आहेत. दरम्यान, जाहीर सभा, कॉर्नर सभा आणि रोड शो होऊ लागले आहेत. त्यामुळे तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शिवाय स्व. आर. आर. पाटील (आबा) यांचे चिरंजीव रोहित पाटील दाखल होणार आहेत. त्यामुळे तरुणांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.