संगमेश्वर प्रतिनिधी
संगमेश्वर तालुक्यातील कुळ्येवाशी येथे आज सकाळी सहा वाजता डुकराने हल्ला केल्याने मुलगी आणि वडील जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहिती नुसार नेहमी प्रमाणे सकाळी सुहास गंगाराम गुरव (55)हे मुलगी कु, संपदा सुहास गुरव (16) ही बुरबी हायस्कुलमध्ये शिक्षण घेत आहे. त्यामुळे तील रोज एसटीने शाळेला जावे लागते. आज सकाळी संपदा ही शाळेला जाण्यासाठी निघाली असता तिला एसटीमध्ये बसविण्यासाठी तिचे वडिल बसस्टॉपवर उभे होते. अचानक एका मोठ्या रानटी डुकराने झुडपामधून धाव घेऊन सुहास गुरव यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर अधिक उपचार संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात सुरू आहेत.