जुन्या वदातून केले कृत्य
प्रतिनिधी : रत्नागिरी
तालुक्यातील सोमेश्वर येथे बकऱ्याची मान पिरगळून ठार मारल्याचा आरोप असलेल्या संशयिताची न्यायालयाने 25 हजाराच्या जातमुचलक्यावर मुक्तता केल़ी मुबीन इस्माईल सोलकर (57, ऱा मुस्लिम मोहल्ला सोमेश्वर रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आह़े त्याच्याविरूद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करत अटक केली होत़ी.
काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा तक्रारदार व मुबीन सोलकर यांच्यात कडाक्याचे भांडण झाले होत़े याच रागातून मुबीन याने 24 ते 25 जुलै 2023 च्या दरम्यान सोमश्वर चिधींचा बाग येथे तक्रारदार यांच्या बकऱ्यांच्या गोठ्याची कडी कुलूप तोडून आत पवेश केल़ा यावेळी मुबीन याने बकऱ्यांची मान पिरगळून त्यांना ठार मारल़े अशी तक्रार तक्रारदार यांच्याकडून रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत दाखल करण्यात आल़ी.
या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाल़े तसेच मृत बकऱ्यांचा पंचनामा देखील पोलिसांकडून करण्यात आल़ा तक्रारदार याने दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी मुबीन सोलकर याच्याविरूद्ध भादंवि कलम 429,461 व पाण्यांना क्रृरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनिमय 1960 चे कमल 11 (एल) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होत़ा.