प्रतिनिधी/सांगली
राजकुमार वसंत इंगवले रा. जत हे पत्नीच्या उपचारासाठी विश्रामबाग हॉस्पिटलमधील डॉ. संजीव कुलकर्णी यांच्याकडे आले होते तेथून ते रिक्षाने लॅब तपासणी करणे करता एका रिक्षांमधून गेले असता. त्यावेळी रिक्षामध्ये दवाखान्याची कागदपत्रे व रोख रक्कम दीड लाख रुपये असलेली पिशवी ते रिक्षातच विसरले. वाहतुक शाखेच्या मदतीने या रिक्षाचालकाचा शोध घेण्यात आला. रिक्षा चालकांने इंगवले यांना ही दीड लाखाची रक्कम आणि त्यांची कागदपत्रे असणारी पिशवी त्यांना प्रामाणिकपणे परत केली.
ही पिशवी विसरल्यानंतर तात्काळ राजकुमार इंगवले यांनी वाहतूक शाखा सांगली येथे येऊन घडलेली सर्व घटना सांगितली. वाहतूक शाखेच्या प्रज्ञा देशमुख यांनी व त्यांच्याकडील स्टाफ यांच्या मदतीने सीसीटीव्ही व इ चलन आधारे रिक्षा शोधण्यासाठी प्रयत्न केले तसेच रिक्षा क्रमांक एमएच 10 के 4287 या वाहनाचे मालक व मिरज रिक्षा संघटनेचे अध्यक्ष महेश चौगुले यांच्या रिक्षामध्ये पैसे असलेली पिशवी मिळाल्याने त्यांनी तात्काळ वाहतूक शाखा सांगली आणि राजकुमार इंगवले यांच्याशी संपर्क साधून वाहतूक शाखा सांगली येथे आणून दवाखान्याची कागदपत्रे व रोख रक्कम दीड लाख रुपये इंगवले यांना परत दिले रिक्षा संघटनेचे अध्यक्ष महेश चौगुले राहणार मिरज यांचे प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे गुलाब पुष्प देऊन वाहतूक शाखा सांगली कार्यालयामार्फत सत्कार करण्यात आला.