सावंतवाडी, प्रतिनिधी
शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते स्लीपर कोच एसटी बस शुभारंभ करण्यात आला.प्रथमच नाॅन एसी सावंतवाडी ते पुणे स्लीपर कोच एसटी बस सुरू झाली त्याचा शुभारंभ सोमवारी सायंकाळी उशिरा करण्यात आला.
सावंतवाडी एसटी महामंडळाच्या डेपोची स्लीपर कोच सावंतवाडी -आंबोली- पुणे निगडी मार्गावर धावणार आहे.या गाडीचा शुभारंभ शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी केला. सायंकाळी ७.१५ वाजता गाडी सुटणार आहे.नाॅन एसी स्लीपर कोच सुरू झाली,ती महाराष्ट्र राज्यात प्रथमच सावंतवाडी एसटी महामंडळाच्या डेपोतून सुरू झाली आहे,असे त्यांनी यावेळी सांगितले.
तसेच इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करण्यासाठी आपला प्रयत्न आहे. सावंतवाडी एसटी डेपो दुरुस्ती करण्यात येत असतानाच गौरी -गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर रंगरंगोटी, खड्डे बुजवून सुव्यवस्था राखण्यासाठी आपण एसटी महामंडळाला निधी मंजूर केला, असे केसरकर यांनी सांगितले.यावेळी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, तहसिलदार श्रीधर पाटील, जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख नारायण राणे, गजानन नाटेकर, नंदू गावडे, प्रसन्न शिरोडकर, एसटी विभागीय अधिकारी श्री पाटील तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी, प्रवासी उपस्थित होते.