मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त अजित पवार यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर टिका करताना आपल्या मनातील खदखदही बोलून दाखवली. आपल्याला विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी राहायचे नसून पक्षाच्या कामात झोकून द्यायचे असल्याची ईच्छा त्यांनी अध्यक्ष शरद पवार, कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोर बोलून दखावली. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी असे सांगितल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी बहीण म्हणून आपल्या भावाची इच्छा पूर्ण व्हावी अशी प्रतिक्रिया मांध्यमांना दिली.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाअंर्गत विविध पदांसाठी मतभेद असल्याच्या अफवा फेटाळून लावत खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “अजितदादांची इच्छा पूर्ण व्हावी, अशी माझीही इच्छा आहे. अजितदादांची इच्छा पूर्ण होईल की नाही, याचा निर्णय संघटनेचा असेल. पण मला खूप आनंद आहे की त्यांना पक्षासाठी काम करायचे असून पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळेल. अजित दादांना प्रदेशाध्यक्ष बनवायचे की नाही हे पक्षाच्या निर्णयावर अवलंबून आहे. पण एक बहीण म्हणून माझ्या भावाच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात.” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते असलेल्या अजित पवार यांना पक्षात नुकत्याच झालेल्या फेरबदलात पक्षाची कोणतेही जबबादारी देण्यात आली नाही. तर लोकसभा खासदार सुप्रिया सुळे आणि राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल यांना पक्षाचे कार्याध्यक्ष करण्यात आले आहे.