बेळगाव – मोबाईल चोरीसाठी घरात शिरलेल्या एका तरुणाला संतप्त जमावाने चोप दिला. मंगळवारी रात्री आझादनगर परिसरात हि घटना घडली असून त्याचा साथीदार फरारी झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. मंगळवारी रात्री दोन तरुण संशयास्पदरित्या फिरत होते. लहान मुलांच्या हातातील मोबाईल पळविण्याचा प्रकार घडला. मोबाईलसाठी हे तरुण दरवाजा उघडा असलेल्या घरात डोकावून पहात होते. लहान मुलांच्या हातातील मोबाईल हिसकावून घेऊन पलायन करताना नागरिकांनी पाठलाग केला. दोघा जणांपैकी एकट्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या साथीदाराने मात्र तेथून पळ काढला. संतप्त जमावाने त्याला चांगलाच चोप दिला. साथीदारा विषयी त्याच्याकडे चौकशी करण्यात आली. नंतर त्या तरुणाला माळमारुती पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. यासंबंधी बुधवारी रात्री माळमारुती पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असता पोलिसांनी माहिती देण्यास नकार दिला.
Trending
- पतंजली फूड्स लिमिटेडचा नफा 22 टक्क्यांनी घटला
- CAA अंतर्गत नागरिकत्वाची प्रमाणपत्रे गृहमंत्रालयाकडून अर्जदारांना वितरीत
- ‘न्यूजक्लिक’चे प्रबीर पुरकायस्थ यांची तात्काळ सुटका करण्याचे ‘सर्वोच्च’ आदेश
- पलूसचे मंडल अधिकारी अन् एजंटाला साडेसात हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले
- वाळवा येथे हार्डवेअरच्या दुकानाला आग लागून 20 लाखांचे नुकसान
- स्वयंपाकाचा गॅस व्यावसायिक सिलेंडरमध्ये…जीएसटी चुकवण्यासाठी रॅकेटकडून कारनामे
- बांबोळी येथे दोन सिलिंडरचा स्फोट
- देविदास कोनाडकर यांचा खूनच