|Sunday, May 28, 2017
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » पुढील पिढीसाठी आश्वासक पावले उचलापुढील पिढीसाठी आश्वासक पावले उचला 

सावंतवाडी : वाढदिवसानिमित्त केक कापतांना राजमाता सत्वशीलादेवी भोसले. बाजूला भारती महाराज, ऍड. सुभाष देसाई, उर्वशी भोसले, शुभदादेवी भोसले, बाळराजे भोसले. 2. हॉलचे उद्घाटन करतांना राजमाता सत्वशीलादेवी भोसले. बाजूला बाळराजे भोसले, टी. व्ही. पाटील आदी.  अनिल भिसे

प्रतिनिधी

सावंतवाडी

 पुढच्या पिढीसाठी काहीतरी करण्याची भावना प्रत्येकाने बाळगली पाहिजे. युवा पिढीला दिशा मिळणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सावंतवाडी संस्थानच्या राजमाता सत्वशीलादेवी भोसले यांनी येथे केले. मला तुमचे जे प्रेम मिळाले, त्याबद्दल मी ऋणी आहे. दक्षिण रत्नागिरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या पंचम खेमराज महाविद्यालयात नवनवीन अभ्यासक्रम सुरू आहेत. त्याच्या लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

 दक्षिण रत्नागिरी शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री पंचम खेमराज महाविद्यालय,
संस्थानप्रेमी, मदरक्वीन नर्सरी, लॉ कॉलेज यांच्यावतीने राजमातांचा 80 वा वाढदिवस पंचम खेमराज महाविद्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर, राजेसाहेब तथा संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत खेमसावंत भोसले, उपकार्याध्यक्षा शुभदादेवी भोसले, भारती महाराज, राजकन्या उर्वशी भोसले, संस्थेचे सचिव ऍड. सुभाष देसाई, सहसचिव सुरेश भेसले, दीपक कुबल, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, ऍड. राजे भोसले, सौदत्ती भट, प्राचार्य डॉ. दिलीप भारमल उपस्थित होते.

 यावेळी वाढदिवसानिमित्त शूटींग रेंज हॉल, जिम्नॅशियम हॉलचे उद्घाटन राजमाता सत्वशीलादेवी भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.

 यावेळी राजमाता पुढे म्हणाल्या, सन 1945 मध्ये माझ्या सासूबाई राणी पार्वतीदेवी भोसले यांनी कॉलेज सुरू केले. त्यानंतर उच्चशिक्षणाची सोय व्हावी, यासाठी 1961 मध्ये राजेसाहेबांनी महाविद्यालय सुरू केले. काही मंडळींनी याला विरोध केला होता. स्वत: शिवरामराजे भोसले यांनी एकसदस्यीय समिती निर्णयाची पूर्तता करण्यासाठी नियुक्त केली. त्यांच्या प्रेरणेतून दक्षिण रत्नागिरी शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन झाले. आज केजी ते पदव्युत्तर, कायद्याचे शिक्षण या महाविद्यालयातून दिले जात आहे.

 यावेळी खेमसावंत भोसले, उर्वशी भोसले, भारती महाराज, नकुल पार्सेकर, लॉ कॉलेजच्या प्राचार्या रुकसाना करोल, प्रा. डी. डी. गोडकर, अनुजा साळगावकर यांनी मनोगत व्यक्त केले.

 ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर म्हणाले, राजमाता सत्वशीलादेवी भोसले तत्त्वनिष्ठ कलाप्रेमी आहेत. या जिल्हय़ाच्या, कोकणच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांचे कार्य भावी पिढीसाठी प्रेरणादायी आहे. यावेळी त्यांनी खासदार अनिल देसाई यांच्या निधीतून महाविद्यालय परिसरात डांबरीकरण केले जाईल, अशी ग्वाही दिली.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रगती नाईक-अमृते, प्रा. निलम धुरी यांनी केले. आभार एस. ए. ठाकुर यांनी मानले. यावेळी ऍड. श्याम सावंत, सदासेन सावंत, सोमकांत नाणोसकर, तहसीलदार शशिकांत जाधव, राजू बेग, डी. टी. देसाई, विश्वनाथ पेडणेकर, डॉ. तिरोडकर, महेश खानोलकर, काका मांजरेकर, जयप्रकाश सावंत, रेश्मा सावंत, अशोक दळवी, माजी आमदार शिवराम दळवी, काँग्रेस तालुकाध्यक्ष संजू परब, जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, सुशिल मोडक, राजू मसुरकर, प्रतापराव तोरसकर, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, ऍड. प्रमोद प्रभू-आजगावकर यांनी शुभेच्छा दिल्या.

Related posts: