|Wednesday, May 24, 2017
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » नक्षली कारवाया नवीन क्षेत्रात वाढल्यानक्षली कारवाया नवीन क्षेत्रात वाढल्या 

NAXLI

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

नक्षलवाद्यांनी आपल्या दहशतवादी हल्ल्यांच्या धोरणात बदल केल्याचे आढळून आले आहे. नव्या धोरणानुसार पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशमधील नक्षलवाद्यांच्या पारंपरिक ठिकाणातील दहशतवादी कृत्ये कमी झाली. त्याऐवजी नवीन क्षेत्रात दहशतवादी कृत्ये वाढली आहेत. त्यामध्ये बिहार, कर्नाटक आणि केरळमधील भागांचा समावेश आहे.

इन्स्टिटय़ूट ऑफ डिफेन्स रिसर्च अँड ऍनालिसिस (आईडीएसए) ने गेल्या काही वर्षांमध्ये पारंपरिक भाग सोडून नक्षलवाद्यांच्या दहशतवादी कृत्यांचा विस्तार नवीन क्षेत्रात सुरू झाल्याचे म्हटले आहे. गृहमंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील ठिकाणे नक्षलवाद्यांचे बालेकिल्ले मानले जात असून तेथील दहशतवादी कृत्यांचे प्रमाण कमी झाले असून बिहारमधील वैशाली, मुजफ्फरपूर, सीतामढी, भोजपूर, रोहतास, सारण, पाटणा, शिवहर, नालंदा, मुंगैर, गया, पूर्व चंपारण्य, बेगुसराय आणि गोपालगंज जिल्हय़ात नक्षली दहशतवाद पसरलेला पाहण्यास मिळाला आहे.

2009 मधील शासकीय अहवालानुसार 20 राज्यातील 223 जिल्हय़ात नक्षली कारवाया असल्याचे आढळून आले. ऑगस्ट 2012 मध्ये केंद्राने संसदेत दिलेल्या माहितीनुसार 119 इतर जिल्हय़ातही नक्षलवाद्यांच्या दहशतवादाने पाय पसरले आहेत. लाल गलियारा योजनेमुळे दहशतवादी कृत्यांना चाप बसल्याने नक्षलवाद्यांनी आपल्या हिंसक कारवायांसाठी नवीन क्षेत्रे निवडली असल्याची माहिती सीबीआयचे माजी संचालक जोगिंदर सिंह यांनी दिली आहे. नक्षली दहशतवाद उखडून काढण्यासाठी विशिष्ट कायदा अस्तित्वात नसून त्यांना आळा घालण्याच्या कामी आधुनिक शस्त्रास्त्रs तसेच साधनांच्या बाबतीत राज्यांनीही गंभीरतापूर्वक पाहिलेले नाही. त्यासाठी राज्यांच्या एकजुटीतून नक्षलवाद्यांविरुद्ध रणनीती बनविण्याची गरज आहे, असे जोगिंदर सिंह यांनी सांगितले.

Related posts: