|Thursday, July 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » बिपीन रावतनी स्वीकारली लष्करप्रमुखपदाची सूत्रे

बिपीन रावतनी स्वीकारली लष्करप्रमुखपदाची सूत्रे 

नवी दिल्ली :

लेफ्टनंट जनरल बिपीन रावत यांनी शनिवारी दलबीरसिंग सुहाग यांच्याकडून लष्करप्रमुखपदाचा पदभार स्वीकारला. 17 डिसेंबर रोजी केंद्र सरकारकडून बिपीन रावत यांची लष्करप्रमुखपदी निवड करण्यात आली होती. विद्यमान लष्करप्रमुख दलबीरसिंग सुहाग हे 31 डिसेंबरला निवृत्त झाल्यानंतर त्यांनी लष्करप्रमुखपदाचा पदभार रावत यांच्याकडे सुपूर्द केला. बिपीन रावत हे मूळचे उत्तराखंडमधील असून 1 सप्टेंबर 2016 रोजी त्यांनी उप लष्करप्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यांना डिसेंबर 1978 मध्ये 11 गोरखा रायफल्सच्या पाचव्या बटालियनचे कमिशन प्राप्त झाले होते. त्यांना प्रतिष्ठित समजला जाणारा ‘स्वार्ड ऑफ ऑनर’ हा पुरस्कार मिळाला होता.