|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » रंजक पद्धतीने अवयवदान समुपदेशन करणार

रंजक पद्धतीने अवयवदान समुपदेशन करणार 

चळवळीसाठी राज्यभर फिरण्याचा आपटेकाका यांचा संकल्प,

वयाच्या 65 व्या वर्षीही सातत्याने कार्यरत, घेण्यासारखा आदर्श  

रामकृष्ण खांदारे/ मुंबई

स्थळ, वेळ : महाराष्ट्र कामगार मंडळ सभागृह, लालबाग, 30 डिसेंबर 2016

विषय : अवयवदान समुपदेशन

वक्ता : श्रीकांत आपटे (आपटे काका)

काय आपटेकाका, अवयवदानबाबत तुम्ही एवढे सांगत आहात. पण हिरानंदानी हॉस्टिलमधील किडनी रॅकेटने अवयवदान करताना काळा बाजार सुरु असल्याचेच समोर आले ना असा सवाल पाटील नावाच्या एका व्यक्तिने पेला. यावर आपटेकाका म्हणाले, कोणत्याही वाईट प्रचाराचे फळ वाईटच असते. हिरानंदानी किडनी रॅकेट प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट आहे. मात्र, त्याचवेळी गेल्या वर्षभरात 28 वेळा हृदयदान केल्याच्या घटना घडल्या. या चांगल्या गोष्टींकडे आपण पाहतच नाही. गेल्या 46 वर्षात अवयवदान चळवळीत जे घडले नाही ते आज घडत आहे.

यावर्षीच्या शेवटच्या आठवडय़ात आपटेकाका यांचे अवयवदानाबाबतचे समुपदेशन लालबाग येथे सुरू असतानाच असा प्रश्न उपस्थित केला होता. आपटेकाका आणि अवयवदान चळवळ समीकरण जुळले आहे. वयाच्या 65 वर्षी ते अवयवदानाबाबतचे समुपदेशन करत आहेत. शंका आणि प्रश्न विचारणाऱयांसाठी त्यांचा फोन चोवीस तास सुरू असतो. आपटेकाका यांचे शिक्षण बीएससी, एलएलबी आहे. 40 वर्षाच्या सेवेनंतर बँक ऑफ महाराष्ट्रमधून वरिष्ठ प्रबंधक म्हणून निवृत्त झाले. यातील सहा वर्षे बँकिंग लोकपालांचे डेप्युटी सेपेटरी म्हणून रिझर्व्ह बँकेत प्रतिनियुक्ती ग्राहक न्यायालयात वकिली केली. मात्र, त्यांचे मन रमले नाही. निवृत्तीनंतर एखादी व्यक्ती सुखी निवृत्ती जीवन देखील जगला असता. मात्र, समाजाला चिरंतर फायदा होणारे समाजकार्य करावे अशा विचारात ते होते. अवयवदानाबाबत ऐकल्यानंतर त्यांनी ग्रँड मेडिकल महाविद्यालय गाठले. महाविद्यालय प्रमुखाची भेट घेऊन अवयवदान विषयाबाबत जाणून घेण्याची इच्छा प्रकट केली. त्यांनी प्रथम स्वत:चे देहदान आणि अवयवदान केले आहे. सध्या राजहंस प्रतिष्ठान मुंबई या संस्थेचे देहदान अवयवदान प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. देहदान अवयवदान जनजागृती चळवळीत त्यांनी स्वतःला झोकून दिले आहे. देहदान अवयवदान समुपदेशन आणि समन्वयन कार्य अक्षरशः चोवीस तास करतात. समुपदेशन करताना अकरा वेळा देहदात्याच्या कुटुंबियांसाठी रात्री देहदानासाठी मेडिकल कॉलेजपर्यंत प्रत्यक्ष सोबत दिली आहे. एकदा तर प्रत्यक्ष शवविच्छेदन चालू असतानाच नातेवाईक व डॉक्टरांच्या संमतीने नेत्रदान मिळवल्याची घटना त्यांनी सांगितली.

जनजागृती सभांमध्ये रोटरी क्लब, वायडब्ल्यूसीए नर्सिंग कोर्स, महानगरपालिकेची हॉस्पिटले, कॉलेज, चर्चमध्ये देहदान अवयवदान प्रचारसभांमध्ये मार्गदर्शन केले. दरम्यान, 650 हून अधिक लोकांची देहदान आणि अवयवदानासाठी नोंदणी केली आहे. या कार्यामुळे त्यांना डॉ. नीतू मांडके वैद्यकीय सेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

सध्या ‘देहदान अवयवदानावर बोलू काही’ या दृकश्राव्य प्रयोगाचे सादरीकरण मानधन वा प्रवास खर्च न घेता ते करतात. आता त्यांच्या सहचारिणी नीला आपटे देखील सहभागी झाल्या आहेत. आगामी वर्षात राज्यभर समुपदेशन करण्याचा त्यांचा संकल्प आहे.