|Thursday, July 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » वाखरी पालखीतळांचे क्षेत्र वाढणार

वाखरी पालखीतळांचे क्षेत्र वाढणार 

पंढरपूर / प्रतिनिधी

 संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या वाखरी येथील पालखीतळांचे क्षेत्र आता वाढणार आहे. यासाठी शासनाची येथील गायरानांसाठी असणारीजिमिन तसेच पुनर्वसनसाठी भूसंपादन केलेली शिल्लक जमिन यांचा समावेश आता पालखी सोहळा प्रमुखांच्या संमतीने वारीसाठी पालखीतळ म्हणून वापरला जाणार असल्यांची माहीती पुणे विभागीय आयुक्त एस.चोंक्कलिंगम यांनी दिली आहे.

पंढरपूरातील तीर्थक्षेत्र विकास आराखडयातील विकासकामे तसेच पालखीतळांचा आणि पालखीमार्गाचा विकासांच्या आढावा बैठक घेण्यासाठी ते आज पंढरपूरात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी प्रविण देवरे , तहसिलदार नागेश पाटील , पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट ,आमदार प्रशांत परिचारक आदि याप्रसंगी उपस्थित होते.

   याप्रसंगी पुढे बोलताना विभागीय आयुक्त एस. चोंक्कलिंगम म्हणाले , सध्या पालखीतळांची जागा वाढवण्यासंदर्भात आम्ही सर्व पालखी सोहळा प्रमुखांची संमती घेतली आहे. त्यानुसारच पालखीतळांचा विकास केला जाणार आहे. याचबरोबर देहू , आळंदीपासून पंढरपूरपर्यत सर्व मार्गामधे असणा-या पालखीतळांवर देखिल भाविकांना कुठल्या सुविधा देण्यात द्याव्यात यांची निश्चिती झाली आहे. यासंदर्भात येत्या काही †िदवसात प्रशासकीय बाबी पूर्ण करून साधारणपणे तीन महीन्यात पालखीतळावरील भाविकांना दिल्या जाणा-या सोयीसुविधांच्या कामाची सुरूवात होणार असल्यांचे देखिल ते यावेळी म्हणाले आहेत.

  तसेच याशिवाय पालखीमार्ग हा राष्ट्रीय महामार्ग होणार आहे. यासाठी केंद्र सरकारने या मार्गावर 25 हेक्टर जागेची मागणी केली आहे. मात्र अशी जागा सध्या मिळणे अवघड आहे. एकाच खाजगी व्यक्तीजवळ ही जागा उपलबध आहे. सदरच्या जागेवर ट्रक टर्मिनल करणार आहे. जेणेकरून या ट्रक टर्मिनलया उपयोग  हा वारी काळामधे पालखीतळ म्हणून सुध्दा वापरता येणार आहे. यासाठी 25 हेक्टर जागा देखिल लवकरच कशी उपलब्ध करता येईल. यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत.

तसेच पालखीमार्गावरील काही पेट्रोलियम कंपन्यांनी राज्य सरकारकडे एक प्रस्ताव दिला आहे. यामधे पेट्रोलियम कंपन्यानी शासनाने जागा दिली तर स्वच्छतागृहे उभा करून देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र याबबात अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र यावर लवकरच त्यांच्या असणा-या प्रस्तावाचा विचार करून चांगला निर्णय घेण्यात येईल असे देखिल ते यावेळी म्हणाले आहेत.

  चौकटित –

65 एकर होणार आता ‘80 एकर ’

     मुंबई उच्च न्यायलयाने वाळवंटामधे राहुटी टाकून , निवारा , स्वयंपाक आदि गोष्टींवर निर्बेध्द घातले. त्यामुळे प्रशासनाने पर्यायी जागा म्हणून चंद्रभागेच्या पैलतीरावर 65 एकरची जागा विकसित केली. यामधे वारकर-यांना राहण्यासाठी जागा शोचालय , पिण्यांच्या पाण्याची व्यवस्था , दिवाबत्ती यात्राकालावधीसाठी वैद्यकिय सेवा आदि उपलब्ध करून दिले आहे. या 65 एकर लगत रेल्वे प्रशासनाची असणारी 15 एकर जागा देखिल आता केंद्र सरकार राज्याकडे हस्तांतरीत करणार आहे. त्याबदल्यात रायगड जिल्हयातील राज्य सरकारची जागा केंद्र सरकारच्या रेल्वे विभागाला देण्यात येणार आहे. याबाबत पुढील काही दिवसात प्रशासकीय कार्यवाही पुर्ण होउन आता वारकर-यांसाठी 65 एकर ऐवजी 80 एकर जागा उपलब्ध होणार आहे. याठिकाणीही अजून वारकर-यासांठी कोणकोणत्या सोयीसुविधा देता येतील. याबाबतचे नियोजन करण्यांचे काम सुरू केल्यांची माहीती विभागीय आयुक्त एस. चोंक्कलिंगम यांनी दिली आहे.  

Related posts: