|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » औज बंधाऱयात पोहोचले पाणी : शहराचे जलसंकट दूर

औज बंधाऱयात पोहोचले पाणी : शहराचे जलसंकट दूर 

वार्ताहर/ सोलापूर

शहराच्या पाणी पुरवठय़ासाठी उजनी धरणातून सोडण्यात आलेला पाणीसाठा शनिवारी दुपारी 3 च्या सुमारास औज बंधाऱयात पोहोचले आहे. यामुळे आता फेब्रुवारीमध्ये होणाऱया महापालिकेच्या निवडणुकांपर्यंत शहराच्या पाणी पुरवठय़ाची चिंता मिटली असून जलसंकट दूर झाले आहे. आजपर्यंतच्या इतिहासात विक्रमी 90 दिवसांपर्यंत बंधाऱयातील पाणी वापरुन विभागाने हा नवा उच्चांक गाठला असून शासनास द्यावयाचे अडीच कोटींचा निधीही यामुळे वाचला असल्याची माहिती महापालिका पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता संजय धनशेट्टी यांनी ‘तरुण भारत संवाद’ ला दिली.

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सोलापूरकरांना सुखद बातमी मिळाली असून निम्म्या शहराची तहान भागविणारा अनुज बंधारा पाण्याविना हिवाळय़ातच कोरडा होणार होता. तत्पूर्वी उजनीचे पाणी औज बंधाऱयात पोहचल्याने पुढील 3 महिन्यासाठी सोलापूरकरांवरील जलसंकट दूर झाले आहे.

बंधाऱयातील पाणी पातळी खालवल्याने शहराच्या पाणी पुरवठय़ासाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी महापालिकेकडून करण्यात आली होती. दरम्यान, पाणी नसल्याने शहराचा पाणी पुरवठा तीन दिवसाआड करण्याचा निर्णय घेण्याची विनंती पदाधिकाऱयांकडे प्रशासनाने केली होती. मात्र, उलट निवडणुका तोंडावर आल्याने याला विरोध करुन काँग्रेसने शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची मागणी केली. ही प्रशासनाने शक्य नसल्याचे सांगत धुडकावून लावली होती. अशात 21 डिसेंबर रोजी पालकमंत्र्यांच्या आदेशावरुन पाटबंधारे विभागाने 7 हजार क्युसेक्सने उजनी धरणातून सोडण्यात आले हेते. या पाण्याने शुक्रवारी सायंकाळी भंडारकवठे बंधारा पार केला. 231 किमी चा प्रवास करुन पाणी काल शनिवारी दुपारी औज बंधाऱयात पोहोचले आहे.

उजनी धरणाच्या पाण्याची 4 आवर्तने सोलापूरकरांसाठी अनुज बंधाऱयात घेतली जातात. मात्र यंदा गेल्या आवर्तनात उजनीचे पाणी जवळपास 90 दिवस पुरविले आहे. त्यामुळे शासनास द्यावयाची अडीच कोटी रक्कम वाचली आहे. सध्या आणखी 10 दिवस पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे एक आवर्तन पुढे सरकले आहे. महापालिकेसाठी ही एक सकारात्मक सुखद घटना असल्याचे उपअभियंता संजय धनशेट्टी यांनी सांगितले.

Related posts: