|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » केंद्रीय जल आयोग पथकाकडून ‘गडनदी’ची पाहणी

केंद्रीय जल आयोग पथकाकडून ‘गडनदी’ची पाहणी 

चिपळूण/ प्रतिनिधी

पाटबंधारे प्रकल्पातील घोटाळय़ांमुळे चर्चेत आलेल्या आणि लाचलुचपत विभागाकडून चौकशी सुरू असलेल्या संगमेश्वर तालुक्यातील गडनदी प्रकल्पाची पाहणी करत केंद्रीय जल आयोगाच्या पथकाने गुरूवारी आढावा घेतला. गडनदी प्रकल्पाचा प्रधानमंत्री कृषी सिंचई योजनेत समावेश करण्यात आला असल्याने यापुढील कामे सुरु करण्यासाठी केंद्राच्या मार्गर्शक तत्वाचे पालन करावे लागणार आहे. या पाहणी अहवालानुसार या प्रकल्पाची सर्व कामे 2019पर्यंत पूर्ण करणयाचे धोरण असून त्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे.

जिह्यातील शेतकऱयांना वरदान ठरणाऱया पर्यायाने पूर्वेपासून पश्चिम दिशेच्या असंख्य गावांची तहान भागवणाऱया महत्वाकांक्षी गडनदी धरण प्रकल्पासाठी जलसंपदाचे आतापर्यंत 651 कोटी रुपये खर्च झाले आहेत, तर प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अजून 205 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. आवश्यक निधी प्राप्त होत असल्याने प्रकल्प पूर्ण होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर गुरूवारी गडनदी प्रकल्प पाहणीसाठी दिल्लीहून आलेल्या केंद्रीय जल आयोग पथकात नवीनकुमार शर्मा (सहाय्यक निदेशक केंद्रीय जल आयोग दिल्ली) व सचिन गुप्ता (सहाय्यक निदेशक केंद्रीय जल आयोग, दिल्ली) या दोन अधिकाऱयांसह उत्तर कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ ठाणेचे अधीक्षक अभियंता अरुण काळोखे आदींनी पाहणी केली. यावेळी चिपळूण लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर गोडबोले, नातूवाडी उपविभाग क्र. 2चे उपविभागीय अभियंता आर. जी. आळंदकर, नातूवाडी उपविभाग क्र. 4चे उपविभागीय अभियंता व्ही. एम. बनसोडे व संबंधित कर्मचारी उपस्थित होते

भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर जलसंपदा विभागाच्या पूर्वी केलेल्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण करत लाचलुचपत विभागाकडून चौकशी सुरु केली. या चौकशी फेऱयात गडनदीसह कोकणातील अनेक सिंचन प्रकल्प अडकल्याने प्रकल्पावर खर्च करण्याच्या मर्यादा येत पुनर्वसन कामांसह प्रकल्पाच्या दरवाजा व इतर कामांना खीळ बसली होती. मात्र हा जिह्यातील महत्वाकांक्षी मध्यम धरण प्रकल्प असल्याने या प्रकल्पाचा जलसंपदाकडून केंद्राच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करत निधी उपलब्ध करुन घेतला. या प्रकल्प लाभक्षेत्रातील पुनर्वसन, धरण बांधकाम, अपूर्ण कालवे आदी कामांचा समावेश करत एकूण 204.52 कोटी रुपयाचा निधी उपल्ब्ध झाला आहे. हा निधी दोन वर्षात दोन टप्प्यात खर्च करुन 2019ला प्रकल्पासह पुनर्वसन, कालवे आदी सर्व कामे केंद्र व राज्य सरकार यांच्या सहयोगातून जलसंपदा विभाग पूर्ण करण्याची तयारी करत आहे.

नियमितचे मॉनिटरींग- गोडबोले

दरम्यान, या संदर्भात पाटबंधारे विभागाचे येथील कार्यकारी अभियंता चंद्रशेखर गोडबोले यांच्याशी संपर्क साधला असता, हे केंद्राने स्थापन केलेल्या मॉनिटरिंग कमिटीच्या सदस्यांकडून गडनदी प्रकल्पाचे मॉनिटEिरंग केलेले आहे. नियमितपणे नागपूर येथून मॉनिटEिरंग होते. मात्र यावेळी दिल्ली आणि गांधीनगर येथून अधिकारी आले होते. हे मॉनिटEिरंग नियमितचा एक भाग असल्याचे त्यांनी ‘तरूण भारत’शी बोलताना सांगितले.