|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » जिल्हा विज्ञान प्रदर्शनाचा निकाल जाहीर

जिल्हा विज्ञान प्रदर्शनाचा निकाल जाहीर 

गुहागर / प्रतिनिधी

येथील डॉ. रघुनाथ माशेलकर विज्ञान नगरीत पार पडलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रम दिमाखात पार पडला. यावेळी या विज्ञान प्रदर्शनाचा निकाल जाहीर करण्यात आला.

यावेळी शिक्षक आमदार रामनाथ मोते, प्रांताधिकारी कल्पना भोसले-जगताप, माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, नायब तहसीलदार शिल्पा कदम, गटविकास अधिकारी सुभाष माने, जिल्हा पर्यवेक्षक सुनील पाटील, गुहागर एज्युकेशन सोसायटीचे सचिव संदीप भोसले, जिल्हा परिषद सदस्या सौ. नेत्रा ठाकूर, मुख्याध्यापक अर्जुन ढोणे, उपमुख्याध्यापक कुलकर्णी आदी उपस्थित होते.

या विज्ञान प्रदर्शनाचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे-

माध्यमिक विभाग विज्ञान प्रतिकृती स्पर्धा

टेरव-चिपळूण सुमन विद्यालयाच्या संयम कदमचे ऑल इन वन मॉडेल प्रथम, दापोलीतील ए. जी. हायस्कूलच्या सुमेध करमरकर याचे मोबाईल वॉर्म जॅकेट द्वितीय, गुहागर हायस्कूलच्या सोहम विचारे याचे स्मार्ट टॉयलेट तृतीय, तर रत्नागिरीतील रूबिया शेख अडमद नाखवाच्या मेहरीन हमदारे हिच्या क्रॅश सेफ्टी स्मार्ट इंटरनेट मॉडेलने उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला.

माध्यमिक शिक्षक विज्ञान प्रतिकृती स्पर्धा

राजापूर-पाचलमधील सरस्वती विद्यामंदिरच्या सत्यनारायण देसाई यांच्या ‘इझी लर्निंग ऑफ दि ब्लॉक इलीमेंट’ने प्रथम, गुहागर-पालशेत येथील श्रीमती र. पां. पालशेतकर विद्यालयाच्या बी. ए. यादव यांच्या ‘पहा, हाताळा आणि ज्ञान मिळवा’ने द्वितीय, तर चिपळूण-उभळे येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या राजेंद्र जाधव यांच्या ‘प्रयोगातून गणितीय संबोध अभ्यासणे’ने तृतीय क्रमांक मिळवला.

माध्यमिक प्रयोगशाळा परिचर विज्ञान प्रतिकृती स्पर्धा

राजापूर-आडिवरे येथील श्री महाकाली इंग्लिश स्कूलच्या रघुनाथ आडीवरेकर यांच्या ‘मनोरंजनातून विज्ञान’ने प्रथम, रत्नागिरीतील ए. डी. नाईक हायस्कूलमधील जे. ए. कोतवडेकर यांच्या प्रयोगासोबत लागणाऱया विविध साहित्याची निर्मितीने द्वितीय, तर लांजा तालुक्यातील रामेश्वर कोंडगे विद्यालयातील काशिनाथ चव्हाण यांच्या बहुउद्देशीय दुर्बिण प्रतिकृतीने तृतीय क्रमांक पटकावला.

माध्यमिक विभाग लोकसंख्या शिक्षण प्रतिकृती स्पर्धा

दापोली-टाळसुरे न्यू इंग्लिश स्कूलमधील संदेश राऊत यांच्या ‘अनोखे ज्ञान’ने प्रथम, रत्नागिरीतील मिस्त्राr हायस्कूलमधील सिद्धीकी इमामुद्दीन यांच्या ‘चला घडवू विकसित भारत’ने द्वितीय, चिपळूणमधील परांजपे मोतीवाले हायस्कूलमधील सौ. अमोल टाकळे यांच्या पर्यावरण रक्षण या प्रतिकृतीने तृतीय क्रमांक पटकावला.

उच्च प्राथमिक विभागातील विज्ञान प्रतिकृती स्पर्धा

संगमेश्वर-साडवलीमधील कै. सौ. मीनाताई ठाकरे माध्यमिक विद्यालयातील समृद्धी महाडीक याच्या ‘पॅड ऑन फायर’ने प्रथम, राजापूर-पाचल येथील सरस्वती विद्यामंदिरच्या ज्ञानेश्वरी देसाई हिच्या ‘झेंडूची यशस्विता मूल्यवर्धित उत्पादने’ने द्वितीय, चिपळूण-निरबाडे रामवरदायिनी हायस्कूलमधील विजय उचाटकर याच्या ‘सिंधुसार सूर्यावर्त वेदनाशामक तेल’ने तृतीय, तर चिपळूण-खेर्डी चिंचघर (सती)मधील ऋषिकेष पाटील याच्या ‘अन्न उत्पादनातील सूक्ष्म तंत्रज्ञान’ने उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला.

प्राथमिक शिक्षक प्रतिकृती स्पर्धा

गुहागर-तळवली आगरवाडी जिल्हा परिषद शाळा क्र. 3च्या प्रकाश गोरे यांच्या ‘मनोरंजनातून गणित’ने प्रथम, लांजा-बापेरे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेच्या सौ. संजना वारंग यांच्या ‘संख्यांची अनोखी दुनिया’ने द्वितीय, तर चिपळूण-भोम येथील महादेवराव शिर्के माध्यमिक विद्यालयाच्या धनाजी देसाई यांच्या ‘गणिती दृष्टी’ने तृतीय क्रमांक पटकावला.

प्राथमिक विभाग लोकसंख्या शिक्षण प्रतिकृती स्पर्धा

संगमेश्वर-चाफवली भटाचा कोंडमधील उमेश डावरे यांच्या ‘लेक वाचवा लेक शिकवा’ या प्रतिकृतीने प्रथम, राजापूर-आजिवली जिल्हा परिषद शाळा क्र. 2 मधील सुभाष चोपडे यांच्या ‘पर्यावरण व आरोग्य’ने द्वितीय, तर गुहागर-हेदवी जिल्हा परिषद शाळा क्र. 3मधील बाबासाहेब राशीनकर यांच्या ‘राष्ट्रनिर्माणासाठी लोकजागर’ला तृतीय क्रमांक देण्यात आला.

निबंध स्पर्धा

लांजा-हर्चे बॅ. नाथ पै विद्यालयामधील सिद्धी तेंडूलकर हिने प्रथम, चिपळूणमधील बांदल हायस्कूलच्या प्रिया रॉय हिने द्वितीय, तर रत्नागिरी पटवर्धन हायस्कूलच्या वेदांगी महेश नाईक हिने तृतीय क्रमांक पटकावला.

प्रश्नमंजुषा स्पर्धा

खेड येथील एम. आय. हजवानी इंग्लिश मिडियम स्कूल व ज्यु. कॉलेजमधील खतीब अबुझैद व कादिर सिराजुद्दीन यांनी प्रथम, दापोली ज्ञानदीप विद्यामंदिरच्या अभिजित पाटील व कौमुदी जोशी यांनी द्वितीय, तर पालशेत श्रीमती र. पां. पालशेतकर विद्यालयामधील अथर्व विजय ओक व प्रीती राजेंद्र सोलकर यांना तृतीय क्रमांक देण्यात आला.

नाटय़ीकरण स्पर्धा

गुहागर श्रीदेव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरच्या ‘शांतता… पृथ्वी आयसीयूमध्ये आहे’ने प्रथम, पर्शुराम एस. पी. एम. हायस्कूलच्या ‘हात, पाय, नाक, कान, डोळा’ने द्वितीय, तर लांजा पेडणेकर माध्यमिक विद्यामंदिरच्या ‘सर्जिकल स्ट्राईक’ने तृतीय क्रमांक पटकावला.

 

Related posts: