|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » पाण्याचा थेंब अ्न थेंब अडवला ‘वेळू’करांनी

पाण्याचा थेंब अ्न थेंब अडवला ‘वेळू’करांनी 

विशाल कदम/ सातारा

कोरेगाव तालुक्यातील दुष्काळी पट्टयातील वेळू हे गाव.राजकीय दृष्टया संवेदनशीलच.पाण्याची दरवर्षी आभाळ व्हायची.टँकरच्या वाऱया नोव्हेंबर महिन्यामध्येच सुरु व्हायच्या.पण गावानंच गावच्या भल्यासाठी एक व्हायच ठरवलं.श्रमदान करायचं आणि थेंब अन् थेंब अडवायचा विचार केला.अन् सर्व गावातले बायाबापडे, लहान थोर हातात कुदळ, फावडे, घमाले घेवून श्रमदानाला लागले. सोबत विचारांची जोड म्हणून सामाजिक कार्यकर्तेही आले.बघताबघता गावाच्या एकीतून 45 दिवसात गावच्या शिवारात बंधारे, नालाबांध, पाझर तलावातील गाळ काढून पाणीदार गाव बनवले.वॉटरकपचे बक्षीसही मिळवले.एवढय़ावर न थांबता देशातील पहिला पाझर तलाव जोड प्रकल्प हाती घेतला आहे.दुसराही वॉटर कप मिळवण्यासाठी गावाची तयारी सुरु आहे.

वेळू या गावात दुष्काळ सदृष्य परिस्थिती होती. पाणी फौंडेशनतर्फे वॉटर कपची स्पर्धा जाहीर झाल्यानंतर त्यामध्ये सहभागी होण्याचा मनोदय गावातील लोकांनी व्यक्त केला.सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश पोळ यांच्याबरोबर अजिंक्यताऱयावर श्रमदानाला जाणारे शरद भोसले, अनिल सुर्यवंशी, ऍड. वसंत भोसले, सुखदेव भोसले,प्रवीण भोसले, सतीश भोसले या मंडळीनी गावामध्ये विचार मांडला.यापूर्वीही ग्रामस्थ श्रमदान करत होते. परंतु तांत्रिक बाबी माहिती नव्हती.या स्पर्धेत उतरण्यासाठी पाणी फौंडेशनने हिवरे येथे कार्यशाळा ठेवली होती. त्या कार्यशाळेला गावातील तीन पुरुष आणि दोन महिलांची निवड सरपंच पूनम भोसले यांनी केली.त्या पाच माणसांनी गावांमध्ये आमुलाग्र बदल घडवून श्रमदानासाठी राजकारण बाजूला ठेवून पुढे या असे आवाहन केले. त्यामुळे गावातील 345 कुटुंबातील 1511 जण श्रमदानासाठी उतरले अन् बघता बघता गावाच्या परिसराचा कायापालट झाला.श्रमदान दररोज तीन तास केले जाते.कृषी सहाय्यक सुतार, पिंपरीचे कृषीअधिकारी सुजीत शिंदे श्रमदानाला सात वाजता यायचे.प्रशासनातील सर्वच अधिकाऱयांचे सहकार्य असायचे.अजूनही हे काम सुरु आहे.पहिल्या वॉटर कॅपचे बक्षीस मिळवले आता दुसऱया वॉटर कपचेही बक्षीस मिळवण्याची तयारी सुरु आहे.गावामधील तीन महिला बचतगट लागणारे रोपे तयार करतात.देशातील पहिला पाझर तलाव जोड प्रकल्प येथे साकारत असून बेलेवाडीच्या तलावातील पाणी ग्रव्हीटींने या गावातील तलावांना आणण्यात येणार आहे.या कामामुळे गतवर्षी कसलेही रब्बीचे पिक सापडले नव्हते. आता हरभरा, ज्वारी, सोयाबीनची पिके शेतकऱयांनी काढली आहेत.

Related posts: