|Saturday, November 17, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सभापती अनंत शेट यांच्यामागे खंबीरपणे राहणार

सभापती अनंत शेट यांच्यामागे खंबीरपणे राहणार 

प्रतिनिधी/ डिचोली

मये मतदारसंघातली भाजपच्या उमेदवारीबाबत उठत असलेल्या विविध अफवांमुळे विचलित झालेल्या मयेतील भाजपच्या सक्रीय कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक सभापती अनंत शेट यांच्या निवासस्थानी कुंभारवाडा मये येथे झाली. या बैठकीत कोणत्याही परिस्थितीत सर्व कार्यकर्ते अनंत शेट यांच्यामागे खंबीरपणे उभे राहतील, असा निर्धार करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर सभापती अनंत शेट यांच्यासह उत्तर गोवा जिल्हा अध्यक्ष अंकिता नावेलकर, जिल्हा पंचायत सदस्य शंकर चोडणकर, मयेच्या सरपंच उर्वी मसुरकर, ज्येष्ठ कार्यकर्ते प्रेमानंद म्हांबरे, युवा अध्यक्ष नितीन, चोडणच्या सरपंच दिव्या उसपकर, मये भाजप मंडळाचे अध्यक्ष लाडको किनळेकर आदी मान्यवर उपस्थित होते. मयेत भाजपचे कार्य आमदार शेट यांच्या नेतृत्वाखाली चालू आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडतानाच पक्ष कार्यात अव्वल योगदान दिलेले आहे. असे असताना सध्या मयेतील उमेदवारीबाबत पसरवलेली अफवा ही विरोधकांची चाल आहे. त्यावर कोणीही विश्वास ठेऊ नये, असे आवाहन किनळकर यांनी केले.

उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष अंकिता नावेलकर म्हणाल्या की, आमदार शेट यांना आमचा पूर्ण पाठिंबा असून कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही त्या म्हणाल्या. आमदार शेट हे गेली दहा वर्षे कार्यरत आहेत. सत्तेत नसतानाही ते पक्ष व मतदारसंघात खंबीरपणे सक्रीय आहेत. सतत पक्षाने दिलेली जबाबदारी त्यांनी पूर्णही केली आहे. त्यामुळे पक्ष या मतदारसंघात शेट यांच्याव्यतिरिक्त अन्य कुणाचाही विचार करणार नाही, असा विश्वास चोडणकर यांनी व्यक्त केला.

यावेळी प्रेमानंद म्हांबरे, नरेश मांद्रेकर, विजयकुमार पोळे, कालिदास बोरकर, विश्वास चोडणकर यांचीही भाषणे झाली. आमदार शेट यांनीही यावेळी कार्यकर्त्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले.

Related posts: