|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » वेतनमधील तफावत दूर

वेतनमधील तफावत दूर 

प्राचार्य व प्राध्यापकांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन

प्रतिनिधी/ बेळगाव

पदवीपूर्व महाविद्यालय प्राध्यापक व प्राचार्य यांच्या वेतनामधील तफावत दूर करावी. यापूर्वी आंदोलन केले असता वेतन वाढीचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र डिसेंबर संपत आला असताना देखील अजूनही वेतन वाढविण्यात आले नाही. यामुळे पदवीपूर्व महाविद्याल, प्राध्यापक आणि प्राचार्य असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना निवेदन देवून तातडीने वेतन वाढ करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करु, असा इशारा देण्यात आला आहे.

मागील वषी झालेल्या बारावीच्या पेपर तपासणीवेळी आपले वेतन वाढ करावी, यासाठी तब्बल 90 दिवस आंदोलन छेडले होते. त्यावेळी सरकारने वेतन वाढविले जाईल, असे आश्वासन दिले होते. कुमार नायक वर्दी लागू करावी, याचबरोबर वर्षातून चारवेळा वाढ होणारे वेतन तातडीने वाढवावे, अशा मागण्या करण्यात आल्या होत्या. पण आजपर्यंत ती तफावत दूर करण्यात आली नाही. यामुळे प्राध्यापकांनी आता हे निवेदन दिले आहे.

सरकारने जर वेतन तफावत दूर केली नाही तर अकरावी व बारावी परीक्षेवळी हाताला काळय़ा फिती बांधून निषेध करु, असा इशारा दिला आहे. काल्पनिक वेतन वाढ लागू केलेच पाहिजे, अशीही मागणी यावेळी करण्यात आली आहे. यावेळी प्राचार्य असोसिएशन अध्यक्ष एस. एस. दोडमनी, प्राध्यापक असोसिएशन उपाध्यक्ष रविशंकर जी. मठ, प्राध्यापक असोसिएशनचे बेळगाव जिल्हा अध्यक्ष डी. एस. शिंदे, ए. बी. गुरक्कण्णावर, व्ही. जी. रजपूत, एम. ए. हुक्केरीकर, एम. क्ही. कोलेकर, एम. वाय. कुट्रे यांच्यासह प्राचार्य, प्राध्यापक उपस्थित होते.

Related posts: