|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » Top News » ‘सनबर्न फेस्टिव्हल’ कार्यक्रमस्थळी आग

‘सनबर्न फेस्टिव्हल’ कार्यक्रमस्थळी आग 

ऑनलाइन टीम / पुणे: 

सनबर्न फेस्टिव्हलच्या कार्यक्रमस्थळी आग लागल्याने कार्यक्रमासाठी आणलेल्या साहित्याला त्याची झळ बसली आहे. दरम्यान, घटनास्थळी दोन अग्किशामक दलाच्या गाडय़ा दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करत आहे. आगीचे कारण अस्पष्ट आहे.

या फेस्टिव्हलला काही संघटनांनी तीव्र विरोध केल्याने तो वादाच्या भोवऱयात सापडला होता. त्यानंतर या फेस्टिव्हलला 1 कोटींचा दंडदेखील बसला होता. या पार्श्वभूमीवर कार्यक्रमस्थळी आगीची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. आगीचे कारण समजू शकलेले नाही.