|Sunday, July 21, 2019
You are here: Home » उद्योग » रॉयल एनफील्ड विक्रीत 42 टक्क्यांनी वाढ

रॉयल एनफील्ड विक्रीत 42 टक्क्यांनी वाढ 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आयशर मोटर्सची मालकी असणाऱया रॉयल एनफील्ड या दुचाकी विभागाच्या गेल्या महिन्यातील विक्रीत दणदणीत वृद्धी झाली. डिसेंबर महिन्यात कंपनीच्या दुचाकी विक्रीत 42 टक्क्यांनी वाढ झाली. डिसेंबरमध्ये एकूण 57,398 युनिट्सची विक्री करण्यात आली. डिसेंबर 2015 मध्ये 40,453 युनिट्सची विक्री झाली होती असे कंपनीने सांगितले. देशातील विक्रीबरोबरच निर्यातीमध्येही चांगली तेजी आली होती. डिसेंबरमध्ये निर्यातीत तब्बल 160 टक्क्यांनी वाढ झाली. डिसेंबर 2015 च्या 416 युनिट्सच्या तुलनेत डिसेंबर 2016 मध्ये 1,082 युनिट्सची निर्यात कंपनीने केली. एप्रिल-डिसेंबर कालावधात देशातील विक्रीत 36 टक्क्यांनी वाढ झाली. एप्रिल-डिसेंबर 2015 मध्ये 3,59,968 युनिट्सची विक्री झाली होती. त्यातुलनेत यंदा याच कालावधीत 4,88,262 युनिट्सची विक्री झाली.