|Monday, July 22, 2019
You are here: Home » उद्योग » विमा कंपन्यांचे खासगीकरण ?

विमा कंपन्यांचे खासगीकरण ? 

नवी दिल्ली

: लवकरच सरकारच्या मालकीची जनरल इन्शुरन्स कंपनी शेअरबाजारात उतरण्याच्यादृष्टीने पावले टाकण्याची चिन्हे आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रक्रियेच्या मसुद्यावर केंद्रातर्फे महिनाअखेरपर्यंत शेवटचा हात फिरवण्यात येईल. विमा व्यवसायातली सध्या एकच संस्था आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स नामावलीत आहे. न्यू इंडिया ऍशुरन्स, युनायटेड इंडिया इन्शुरन्स, ओरिएंटल इन्शुरन्स आणि नॅशनल इन्शुरन्स या विमा संस्था सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत आहेत. राष्ट्र पुनर्विमा समूहदेखील खासगी क्षेत्रामध्ये आणण्याबाबतचा विचारविनिमय सुरू आहे.या विमा संस्थांना खासगी क्षेत्रामध्ये उतरविण्यासाठी करावी लागणारी तयारी आणि त्याआधी संस्थांच्या वार्षिक आर्थिक ताळेबंदांच्या आकडय़ात करावी लागणारी सुधारणा यावर आता भर देण्यात येत असल्याचे अधिकाऱयांमार्फत सांगण्यात आले. 2017 च्या आर्थिक वर्षाअखेरपर्यंत एक-दोन संस्थांना नामावली यादीत आणण्याचे आमचे प्रयत्न असतील, असेही सांगण्यात आले.

गेल्या अर्थसंकल्पातच सुतोवाच

2015-16 च्या अर्थसंकल्पावेळी खासगीकरणाची ही योजना सरकारच्या विचाराधीन आहे. याचे सूतोवाच करण्यात अले होते. इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया (आयआरडीआय) च्या माहिती आधारे या चारही संस्थांचा नफा मागील वर्षापेक्षा कमी असला तरी यंदा पण त्या नफ्यातच आहेत.

आरोग्य विमा आणि वाहन विमा योजनेत नुकसान भरपाईची टक्केवारी 98.43 आणि 81.18 अशी अनुक्रमे आहे. यातील वाहन विम्याच्या नुकसानभरपाईची टक्केवारी मागील वषीच्या सरासरी (77.14) पेक्षा जास्त आहे. यामुळे विमाधारकांना नुकसानभरपाई देण्याच्या रकमेत वाढ होऊन जी 2014-15 साली रु. 10576 कोटी होती तीच 2015-16 साली रु. 14,962 कोटी झाली. टक्क्मयामध्ये हे प्रमाण 41.47 नी वाढल्याचे दाखवते. सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांचे विमानुकसानीचे प्रमाण 54.42 टक्क्यांनी वाढले असून 2014 सालच्या रु. 7019 वरून 2015-16 साली ते रु. 10839 वर आले आहे.