|Monday, April 22, 2019
You are here: Home » क्रिडा » नेपाळला नमवून भारत अंतिम फेरीत

नेपाळला नमवून भारत अंतिम फेरीत 

वृत्तसंस्था/ सिलीगुडी

सॅफ महिलांच्या फुटबॉल स्पर्धेत सोमवारी येथे यजमान भारताने नेपाळचा 3-1 अशा गोलफरकाने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. या सामन्यात मध्यंतरापर्यंत भारताने नेपाळवर 1-0 अशी आघाडी घेतली होती.

या सामन्यात पूर्वार्धामध्ये भारताचे संपूर्ण वर्चस्व होते. 45 व्या मिनिटाला कमला देवीने भारताचे खाते उघडले. उत्तरार्धात भारतातर्फे दोन गोल नोंदविले गेले. 58 व्या मिनिटाला इंदूमतीने तर 83 व्या मिनिटाला सस्मिता मलिकने भारतातर्फे गोल नोंदविले. नेपाळतर्फे एकमेव गोल 75 व्या मिनिटाला सबित्रा भंडारीने पेनल्टीवर केला.

Related posts: