|Saturday, November 17, 2018
You are here: Home » Top News » संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरींचा पुतळा हटवला

संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरींचा पुतळा हटवला 

ऑनलाइन टीम / पुणे :

      पुण्यातील छत्रपती संभाजी उद्यानातील नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हटवाला आहे. गडकरी यांच्या एका महानाटय़ात संभाजी महाराजांची बदनामी झाल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडनेकेला आहे. मंगळवारी पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास संभाजी बिग्रडच्या 10 ते 15 कार्यकर्त्यांनी राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवला त्यानंतर मुठा नदीत हा पुतळा फेकण्यात आल्याचे स्पष्ट  झाले.

   पुण्याच्या मध्यवर्ती भागात असलेल्या जंगली महाराज रोडवर संभाजी उद्यानात नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा आहे. 1962 मध्ये आचार्य आत्रे यांच्या हस्ते या पुतळय़ाचे अनावरण करण्यात आले होते. राम गणेश गडकरी स्मारक समितीने पुणे महापालिकेला हा पुतळा भेट म्हणुन दिले होते.

Related posts: