|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » Top News » गडकरींचा पुतळा मुठा नदीपात्रात सापडला

गडकरींचा पुतळा मुठा नदीपात्रात सापडला 

पुणे / प्रतिनिधी :

संभाजी उद्यानातून संभाजी ब्रिगेडकडून हटविण्यात आलेला नाटककार व कवी राम गणेश गडकरी यांचा पुतळा मुठा नदीपात्रातून बुधवारी बाहेर काढण्यात आला. हा पुतळा सुरक्षितस्थळी हलविण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ब्रिगेडच्या चार कार्यकर्त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

‘राजसंन्यास’ या नाटकात संभाजी महाराजांची बदनामी केल्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेडने संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा 2 जानेवारीच्या मध्यरात्री हटवून तो मुठा नदीपात्रात फेकून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. याप्रकरणी संभाजी ब्रिगेडच्या चार कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. गडकरींचा पुतळा हटवल्याच्या घटनेचा सर्वच स्तरांतून निषेध व्यक्त करण्यात आला.