|Saturday, March 23, 2019
You are here: Home » Top News » अर्थसंकल्पात देशवासियांना मोदींकडून मिळणार ‘विशेष भेट’?

अर्थसंकल्पात देशवासियांना मोदींकडून मिळणार ‘विशेष भेट’? 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

नोटबंदीनंतर देशभरातील नागरिकांना मोदी सरकारकडून ‘विशेष भेट’ मिळण्याची शक्यता आहे. सरकारकडे ‘युनिव्हर्सल बेसिक इन्कम स्कीम’चा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.या योजने अंतर्गत गरीब तसेच श्रीमंत प्रत्येक नागरीकाला सरकारकडून दरमहिन्याला निश्चित रक्क्म थेट प्रत्येक नागरिकांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.

गरजू व्यक्तींच्या खात्यात 500 रूपये जमा करून या योजनेची सुरूवात केली जाऊ शकते. या योजनेमुळे देशभरातील जवळपास 20 कोटी गरजूंना याचा फायदा

होण्याची शक्यता आहे. हा प्रस्ताव लंडन युनिर्व्हसिटीचे प्राध्यपक गाय स्टँडिंग यांनी तयार केले आहे. केंद्र सरकारमधील एका जबाबदार अधिकाऱयाने ही योजना येत्या अर्थसंकल्पात जाहीर केली जाऊ शकते, असे सांगितल्याचा दावा गाय स्टँडिंग यांनी केला आहे.

Related posts: