|Wednesday, July 18, 2018
You are here: Home » उद्योग » डीएचएफएलकडून गृहकर्ज दरात कपात

डीएचएफएलकडून गृहकर्ज दरात कपात 

मुंबई / वृत्तसंस्था :

डीएचएफएल या भारतातील आघाडीच्या गृहवित्त कंपनीने गृहकर्ज व्याजदरात कपात करण्याची घोषणा केली. कंपनीने व्याजदरात 50 पायाभूत गुणांनी कपात करत 9.10 टक्क्यांवरून 8.66 टक्क्यांवर आणल्याचे सांगितले. हे नवीन दर 4 जानेवारी 2016 पासून लागू होणार आहेत.

निमशहरी आणि दुसऱया, तिसऱया श्रेणीतील शहरांमधील कमी आणि मध्यम उत्पन्न असणाऱया वर्गातील लोकांना स्वतःचे घर घेण्यासाठी डीएचएफएल गेल्या तीन दशकांपासून प्रयत्नशील आहे. घरासाठी कर्ज घेणाऱयांना व्याजदरात कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतला. 2017 मध्ये घर घेण्याचे नियोजन करणाऱया आणि आधीच्या अनेक उपक्रमांमुळे गृहवित्त विभागाला चालना देणारे उत्तम वातावरण निर्माण झाले आहे. गृहकर्ज दरात कपात झाल्याने गृह निर्माण क्षेत्राला प्राधान्य मिळेल. 2017 हे वर्ष या क्षेत्रासाठी सकारात्मक दृष्टीकोन बाळगण्यास मदत करेल, असे डीएचएफएलचे सीईओ हर्षिल मेहता यांनी म्हटले.

 

Related posts: