|Monday, June 17, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » बसपकडून 100 उमेदवारांची यादी जाहीर

बसपकडून 100 उमेदवारांची यादी जाहीर 

लखनौ :
बहुजन समाज पक्षाने उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी आपल्या 100 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पक्षाच्या लखनौ कार्यालयातून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. पक्षानुसार यादीत मुस्लिमांबरोबरच उच्चवर्णीयांना देखील योग्य स्थान देण्यात आले आहे. समाजवादी पक्षात सुरू असलेल्या कलहाला एक मोठी संधी म्हणून पाहणारा बसप मुस्लीम आणि उच्चवर्णीयांच्या मतांच्या सहाय्याने सत्ता मिळविण्याच्या प्रयत्नात आहे.
याआधी मायावती यांनी मंगळवारी बसपने सर्व 403 उमेदवारांच्या यादीत सर्वाधिक 113 तिकीट उच्चवर्णीयांना दिल्याची माहिती दिली होती. यापैकी 66 तिकीट ब्राह्मणांना आणि 36 ठाकूरांना देण्यात आली. मायावती यांच्यानुसार 97 ठिकाणी पक्ष मुस्लीम उमेदवार उतरवेल. 106 उमेदवार ओबीसी वर्गाचे आहेत. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे यावेळी फक्त 87 उमेदवार दलित आहेत आणि यातील 85 जागा आरक्षित आहेत.