|Thursday, January 17, 2019
You are here: Home » क्रिडा » फेडररला पराभवाचा धक्का

फेडररला पराभवाचा धक्का 

वृत्तसंस्था /पर्थ :

येथे सुरू असलेल्या हॉपमन चषक मिश्र सांघिक टेनिस स्पर्धेत स्वित्झर्लंडचे प्रतिनिधीत्व करणाऱया रॉजर फेडररला जर्मनीच्या नवोदित व्हेरेव्हकडून एकेरीत अनपेक्षित पराभव पत्करावा लागला.

जर्मनीच्या व्हेरेव्हने फेडररचा 7-6 (7-1), 6-7 (4-7), 7-6 (7-4) असा पराभव केला. 17 वेळा ग्रॅण्ड स्लॅम अजिंक्यपद मिळविणाऱया फेडररच्या  गुडघ्यावर गेल्या फेब्रुवारीत शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या स्पर्धेत गेल्या सोमवारी फेडररने ब्रिटनच्या इव्हान्सचा पराभव केला होता. या विजयामुळे या स्पर्धेच्या अ गटातील लढतीत जर्मनीने स्वित्झर्लंडवर 1-0 अशी आघाडी मिळविली आहे. गेल्या जूनमध्ये व्हेरेव्हने हॅले टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरीत फेडररला पराभूत केले होते.

Related posts: