|Thursday, October 18, 2018
You are here: Home » Top News » उत्तरप्रदेशमध्ये अखिलेश-काँग्रेस युती निश्चित

उत्तरप्रदेशमध्ये अखिलेश-काँग्रेस युती निश्चित 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

उत्तरप्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि काँग्रेसची युती होणार असल्याची माहिती मिळत आहे. याबाबतची औपचारिक घोषणा काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी परदेशातून भारतात परत आल्यावर होणार आहे.

rahul-akhilesh-580x395

उत्तरप्रदेशच्या राजकारणात समाजवादी पक्षामध्ये उमेदवारांच्या यादीवरुन पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव आणि त्यांचे पुत्र आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यात पक्षांतर्गत कलह निर्माण झाला होता. त्यामुळे काँग्रेस आणि अखिलेशची युती झाल्यास काँग्रेसला तब्बल 100 जागा मिळण्याची शक्यता आहे. असे असतानाच अखिलेश यादव यांनी यापूर्वीच 235 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे युतीनंतरच याबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. उत्तरप्रदेशमध्ये अखिलेश यादव आणि काँग्रेसमध्ये युती होणार का, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Related posts: