|Thursday, January 17, 2019
You are here: Home » Top News » पर्यटन विकासासाठी एक हजार कोटी देणार ; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

पर्यटन विकासासाठी एक हजार कोटी देणार ; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन 

ऑनलाईन टीम / औरंगाबाद :

औद्योगिक क्षेत्रासह परिसरातील पर्यटनस्थळांच्या विकासाला चालना देण्यासाठी मजबूत रस्ते आणि इतर आवश्यक साधनसामुग्री उपलब्ध करुन देण्यास सरकार कटिबद्ध आहे. यासाठी राज्य सरकारकडून एक हजार कोटी रुपये देण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

औरंगाबाद येथे आयोजित प्रदर्शनच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, नागपूर-मुंबई या महामार्गामुळे खऱया अर्थाने मराठवाडा समृद्ध होईल. या समृद्धी मार्गालगत गॅस आणि पेट्रो केमिलची पाईपलाईन टाकण्याचा विचार पेट्रोलियम मंत्रालय करत आहे. तसेच पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी त्याच्या विकासासाठी राज्य सरकारकडून एक हजार कोटी रुपये देण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

Related posts: