|Sunday, October 21, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » नराधम शिक्षकाविरोधात सामाजिक संघटना एकवटल्या

नराधम शिक्षकाविरोधात सामाजिक संघटना एकवटल्या 

वार्ताहर/ निपाणी

शांत, संयमी अशी ओळख असणाऱया व चळवळीतून पुढे आलेल्या निपाणी शहरात विद्यार्थिनीवर शिक्षकानेच बलात्कार केल्याची घटना शनिवार 7 रोजी उघडकीस आली. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध करताना घटनेचे वृत्त समजताच बसवेश्वर पोलीस ठाण्यात सर्व सामाजिक संघटनांसह लोकप्रतिनिधी, पालिका पदाधिकाऱयांनी धाव घेतली. असा प्रकार यापुढे घडू नये यासाठी नराधम शिक्षकासह बलात्कार करण्यासाठी फूस लावणाऱया पत्नीलाही फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी केली.

7 रोजी सकाळी विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घटना समजताच बसवेश्वर पोलीस ठाण्यासमोर श्रीराम सेनेसह धनगर समाजाच्या संघटनांनी धाव घेतली. यावेळी सदर पिडित विद्यार्थिनीवर झालेल्या अन्यायाचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. काहींनी तर त्या नराधमांना आमच्या ताब्यात द्या, आम्हीच त्यांना शिक्षा देतो अशी मागणी केली. पोलिसांकडून पिडित विद्यार्थिनीची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी विलंब होत असल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला. सदर प्रकार हाताळताना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली.

निपाणी शहर व परिसराची शांत संयमी अशी ओळख आहे. अशा या शहरात सर्व काही सुरळीत सुरू असताना घडलेली ही घटना शहराच्या इतिहासाला काळीमा फासणारी आहे. एका शिक्षकाने असे निंदनीय कृत्य करणे म्हणजे शिक्षकी पेशाला काळीमा फासणारे असल्याचे मतही बसवेश्वर पोलीस ठाणे परिसरात जमलेल्या संतप्त नागरिकांतून व्यक्त होत होते. एका निराधार विद्यार्थिनीवर बलात्कार करायला पूरक वातावरण निर्माण करणाऱया नराधम अन्वरहुसेन याची पत्नी रुक्साना हिलाही महिलांनी पोलीस ठाण्यासमोर थांबून शिव्यांची लाखोली वाहिली.

Related posts: