|Friday, July 19, 2019
You are here: Home » Top News » 2020 पर्यंत एटीएम, पेडिट आणि डेबिट कार्ड होणार कालबाह्य : नीती आयोग

2020 पर्यंत एटीएम, पेडिट आणि डेबिट कार्ड होणार कालबाह्य : नीती आयोग 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, एटीएम आणि पीओएस मशिन 2020 पर्यंत देशात कालबाह्य होतील, असे नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी सांगितले.

atm

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना आणि सवलती आणल्या. यातच नीती आयोगाने अनेक योजना अमलात आणल्या. अर्थविषयक तंत्रज्ञान सामाजिक आविष्कार या बाबतीत भारतात मोठे बदल होत आहे. या बदलामुळेच भारतात येत्या काळात डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि पीओएस मशिनची गरज उरणार नाही, असे अमिताभ कांत म्हणाले.