|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » भिलवडी घटनेतील आरोपी पोलीस यंत्रणेच्या रडारवर

भिलवडी घटनेतील आरोपी पोलीस यंत्रणेच्या रडारवर 

वार्ताहर/ भिलवडी

येथील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन खून झालेल्या घटनेच्या तपासासाठी भिलवडी माळवाडीतील शंभर हून अधिक संशयीत तरुण चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आली आहेत.

अल्पवयीन मुलीच्या आईचा मोबाईल ट्रेस करुन त्याच्यावर कोणी किती वेळा फोन करुन संभाषण केले याबाबत पोलीस यंत्रणेने अहवाल मागविला व त्या नंबरचे युवक चौकशीसाठी ताब्यात घेतले असावेत असा अंदाज आहे. चौकशीसाठी त्यांना भिलवडी, पलूस, कुंडल, तासगाव, सांगली अश्या विविध पोलिसठाण्यात चौकशी कसुन केली असावी काही संशयीतांची जबाब आढळून आले असावेत. तर काहीजणांनी इतर माहिती दिली असावी. यामध्ये पोलीस यंत्रणेला गती मिळाली असावी. 5 जानेवारीच्या रात्रीची माळवाडी भिलवडी लगतची जेवढी हॉटेल व बार आहेत वा इतर ठिकाणाची पेट्रोल पंपावरही सीसीटीव्ही फुटेज काटेकोरपणे पाहणी केली असावी. एक दोन तरुण जे प्राथमिक तपासासाठी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात यामधील दोघेजण एका बारमध्ये मध्यपिण्यासाठी बसलेले आढळून आले व त्यांच्या मेन रोडवरील हालचाली वरुन त्यांच्यावर शक्यता नाकारता आली नाही यामुळे तपासाला 8 रोजी गती मिळाली असावी. यातुन आरोपींच्या जवळ पोलिसांना जाता आले तर अद्याप संशयीत म्हणून शक्यता वर्तवली जाणारी जोडगोळी आरोपी म्हणून पोलिसांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही याबाबत भिलवडीसह राज्याचे लक्ष वेधून राहिले आहे की आरोपी कोण? यातील काही लोकांना घटनेपेक्षा आरोपी कोणत्या जाती धर्माचा आहे? याकडे लक्ष वेधले आहे. पिडीत मुलगी कोणत्या जाती धर्माची आहे. यावरुन अनेक गावेच्या गावे बंद पुकारु लागले आहेत. परंतू भिलवडीत घडलेल्या घटनेसाठी अनेक लोक प्रतिनिधी घटना ठिकाणी भेटी दिल्या यामध्ये तपासात व्यस्त असणारी पोलीस यंत्रणेला तपासाचे काम सोडून लोक प्रतिनिधींना बंदोबस्त द्यावा लागला यामुळे या गुह्यातील आरोपींच्या जवळ सर्व ताकदीने कवरेज देण्यास थोडाफार विलंब लागत आहे असेही चित्र दिसत आहे. परंतू कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या घटना स्थळीच्या भेटीने या तपासाला वेगळी कलाटणी मिळाली व त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक तपास प्रगती पथकावर शिक्का मोर्तब झाला. यातुनच तपासाला गती आली जवळपास जिह्याची पोलीस यंत्रणा आरोपींच्या जवळ जाऊन ठेपली आहे केंव्हाही कधीही पोलीस यंत्रणा आरोपींची नावे जाहीर करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. परंतू आरोपींची नावे जग जाहीर होताच ते आरोपी कोणत्या जाती-धर्माचे आहेत यावर काही मंडळी लक्ष वेधून आहेत. यामुळे आरोपी ज्या जाती-धर्माचे असतील त्या जाती-धर्मातील लोकांचा संरक्षणाचा भाग ही निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी पोलीस यंत्रणा सावधागीरीनेच या गुह्याचा उलगडा करतील असाही अंदाज नाकारता येत नाही. परंतू या दुर्दैवी घटनेतून या भागातून किंवा अन्य भागातून कोणतीही दुसरी समाजविघातक घटना घडू नये यासाठी प्रत्येक ग्रामस्थांनी व विशेष लोक प्रतिनिधींनी समाज प्रबोधन करणे गरजेचे आहे.

भिलवडीतील घटनेचा लवकरच आरोपी पोलीस यंत्रणा स्पष्ट करेल अशी शक्यता आहे. या तपासात जिल्हा पोलीस प्रमुख दत्तात्रय शिंदे, उपजिल्हाधिकारी कृष्णांत उपाध्ये, उपविभागीय पोलीस अधिकारी तासगाव कृष्णांत पिंगळे, इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली शिंदे, विटा उपविभागीय पोलीस अधिकारी निंबाळकर, भिलवडी ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सुनिल हारुगडे, वैभव मोसमकर यांच्यासह सर्व सहाय्यक पोलिसांनी तपास कामात रात्रं न दिवस काम पाहत आहेत. यांना लवकरच यश संपादन होईल यात शंका नाही.