|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » कोयना परिसरात पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्का

कोयना परिसरात पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्का 

वार्ताहर/ नवारस्ता

कोयना धरणात शनिवारी सकाळी पुन्हा भूकंपाचा धक्का बसल्याने धरण परिसरासह कोकण परिसर हादरला. शनिवारी सकाळी 9 वाजून 9 मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला. त्याची रिश्टर स्केलवर 2.9 इतकी नोंद झाली. या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून 14.4 किलोमीटर अंतरावर गोषटवाडी गावाच्या दक्षिणेला 5 किलोमीटर अंतरावर, तर खोली जमिनीपासून 10 किलोमीटर इतकी होती. या धक्क्यामुळे कोयनेसह कोकण परिसर हादरून गेला.

सरता सरता सलग दोन, तर नवीन वर्षाची सलामी…!

धरण परिसरात  2016 या सरत्या वर्षाच्या अगदी शेवटच्या दिवशीच 2.5 आणि 2.3 रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या धक्क्यांनी 2016 ला अलविदा केले. आता नव्या वर्षाच्या पहिल्याच आठवडय़ात भूकंपाच्या या धक्क्याने नवीन 2017 या वर्षामध्येही भूकंपाने सलामी दिली.

Related posts: