|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » म्हापशातील ओरिएंटल बँकेला आग

म्हापशातील ओरिएंटल बँकेला आग 

प्रतिनिधी/ म्हापसा

म्हापसा चंद्रनाथ अपार्टमेंटमध्ये असलेल्या ओरिएंटल बँकेला आग लागून लाखो रुपयांची हानी झाली. या आगीत बँकेतील रक्कमही खाक झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून रात्री उशीरापर्यंत अग्निशामक दलाचे जवान आग आटोक्यात आणण्याच्या कामात व्यस्त होते.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार ही आग संध्याकाळी पावणेपाच वाजण्याच्या दरम्यान लागली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. रविवार असल्याने बँक बंद होती. अचानक आगीचे लोळ व धूर बाहेर येत असल्याचे पाहिल्यावर गिरीश मांद्रेकर यांनी घटनेची माहिती म्हापसा अग्निशामक दलास दिल्यावर जवान त्वरित घटनास्थळी दाखल झाले.

दलाच्या जवानांनी पाण्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. पण आतमधून धूर बाहेर येत असल्याने आग विझविणे कठीण बनले होते. अखेर मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून जवानांनी आतमध्ये प्रवेश करून आग आटोक्यात आणली. वातानकुलीत बॅटरीत शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त होत आहे.

अशोक परब यांच्या मार्गदर्शनाखाली रामा नाईक, यशवंत नाईक, साईराज नाईक, सुभाष माजीक, शिवाजीराव राणे, संदीप गावस, दिलीप सावंत, योगेश आमोणकर, देवेंद्र नाईक यांनी आग आटोक्यात आण्यासाठी परिश्रम घेतले.

बॉक्स

अखेर आगीवर नियंत्रण

रविवारी बँकेला सुटी त्यातच बँकेला लागलेल्या आगीवर नियंत्रण आणण्यास अग्निशामक दलाच्या जवानांना बरेच परिश्रम घ्यावे लागले. अखेर मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केल्यानंतर आग आटोक्यात आणण्यात यश मिळविले.

Related posts: