|Thursday, August 22, 2019
You are here: Home » भविष्य » मकर

मकर 

निसर्गचक्रातील दहावी रास म्हणजे मकर. लहानपणी कितीही वाईट परिस्थिती असली तरी स्वकर्तृत्वावर सर्वोच्च पदावर जाणारी ही रास आहे. अनेक दोषही असल्यामुळे या लोकांना बरेच गमवावे लागते. नदी, समुद्र, परराष्ट्र खाती, मोठे अधिकारी यावर या राशीची मालकी आहे. प्रसिद्धी व मानमरातब, विद्युत क्षेत्र, खनिज, मौल्यवान वस्तू व वारंवार नोकरी बदलणे, सतत काळजी हे या राशीचे मूलभूत गुणधर्म आहेत. विश्वदैव, विष्णू या देवतांची विशेष कृपा तसेच शमी, रुई या वृक्षावरही या राशीचा अंमल आहे. रवि, चंद्र, शनि या विरोधी परस्पर ग्रहांची ही रास असल्याने या सर्व ग्रहांची सरमिसळ या राशीत दिसून येते.

 सर्वतऱहेचे कारखाने, लोखंडी वस्तू, व काळय़ा वस्तू, फर्निचर, जमिनी, कष्ट व दु:ख यावर अंमल असणारी ही रास आहे. मंगळ या राशीत उच्च तर रवि त्रासदायक असतो. रविचा क्रोध, मंगळाची धडाडी व उत्साह, चंद्राचा लहरीपणा आणि अपार कष्ट घेऊन ही रास आलेली आहे. यावषी राशीस्वामी शनि जानेवारीपर्यंत लाभात आहे. कोणतीही महत्त्वाची कामे करून घ्या. विशेषतः जागेचे व्यवहार, कर्जफेड, कोणतेही उद्योग व्यवसाय, मोठी गुंतवणूक या काळात करून घ्या, वाहन घेण्यास अनुकूल. त्यानंतर काही काळ शनि बारावा येईल, त्यामुळे कामे अडतील, पण घर वगैरे बांधण्यास हरकत नाही. व्यापारात तेजी राहील. त्याचबरोबर कष्टाचे प्रमाण वाढेल. कोणत्याही अनैतिक मार्गाने पैसा कमवू नका. स्वतःच्या हातून काही गंभीर चुका होतील. सावधानता बाळगा. गुरु वर्षभर भाग्यात आहे, सर्व तऱहेने शुभफल देईल. राजकीय क्षेत्रात प्रवेश कराल व उच्चपद मिळेल. दैवी कृपा राहील. त्याचबरोबर आर्थिक अडचणी, धर्मांधता, तसेच संततीच्या वागण्यामुळे मनःस्ताप. या गुरुच्या कालखंडात घरात कळस असलेला देव्हारा बसवू नका. गुरु बलहीन असल्यामुळे पिवळे व नारंगी रंगाचे वस्त्र धारण केलेल्या साधूसंतापासून दूर रहा. त्यामुळे अनिष्ट प्रभाव टळेल.

उपजीविकेचे साधन नोकरी की व्यवसाय, सर्व काही आरामात मिळणार की कष्टाने मिळणार याचा निर्णय ठरविणारी ही रास आहे. पत्रिकेत मकर रास जेथे पडलेली असेल तेथे निश्चितच कष्ट, स्थैर्य, कामाचा फापटपसारा, अडगळ, नर्व्हसनेस या बाबी दिसून येतात. लाखो मैल लांबीच्या भूमीवर या राशीचा अंमल आहे. म्हणूनच या राशीला भूमीतत्त्वाची रास असे म्हणतात. सतत कष्ट करीत रहाणारी ही रास आहे. मकर राशीची माणसे जोपर्यंत राबत असतात तोपर्यंतच त्यांचे नशीब यांना साथ देत असते. कष्ट व संकट म्हणजे काय, हे या मकर राशीच्या लोकांपासून शिकावे. प्रेमळ अंतःकरण, जमाखर्च ठेवण्याची आवड, वारंवार दुरवरचे प्रवास करण्याची आवड, चाणक्मयनिती, व्यवहार चातुर्य, खाणी-तेल व्यवसाय, पत्रकारिता, इंजिनियरींग, त्वचारोग, लंगडेपणा, संधीवात, हाडांचे विकार वगैरे गुणधर्माची सरमिसळ असणारी ही रास आहे. शनि महाराजांच्या स्वामित्वाखालील ही रास असली तरी या राशीत सर्व बरेवाईट गुणधर्म सामावून घेण्याची शक्ती आहे. त्यामुळेच मंगळासारख्या कठोर ग्रहानेही या राशीला आपली उच्च राशी म्हणून पसंती दिलेली आहे. शनी, मंगळ हे दोघेही प्रखर शत्रू पण न्यायनिवाडा करणाऱयाला हा ग्रह असल्याने ग्रहमालेचा न्यायाधीश म्हणून शनिला लोक ओळखतात. न्यायक्षेत्र म्हणजे अत्यंत रुक्ष विषय. त्यामुळे मकर राशीच्या व्यक्तीही सतत गंभीर व परस्पर विरोधी तत्त्वाच्या ग्रहांचे वर्चस्व या राशीवर आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही. मुंगुस, वानर, सिंह, रुई, फणस, पृथ्वी, यावर अंमल याच राशीचा आहे. त्यामुळे एखादा माणूस साप, मुंगसाचा खेळ दाखवीत असेल तर त्याची मकर रास असण्याची शक्मयता जास्त असते. मकर राशीतील विशि÷ नक्षत्राची योनी मुंगूस आहे. त्यामुळे साप या लोकांच्या जवळपासही फिरकणार नाही. या राशीतील 13 ते 24 अंशापर्यंत जन्म असलेल्या लोकांचा आशीर्वाद फळतो व त्याच्या दुप्पट वेगाने त्यांचा शाप बाधतो व विनाकारण एखाद्याला त्यांचा शाप बाधला की तो दुप्पट वेगाने यांच्याकडे परत येतो. त्यासाठी या राशींच्या लोकांनी विनाकारण कुणालाही चुकुनही वाईट बोलू नये.

कष्ट व चातुर्य, हुशारी, बुद्धीमत्ता व त्यानंतर दैव अशी विचारसरणी या लोकांची असल्याने या बाजीच्या जोरावरच तुम्ही यशस्वी व्हाल. साडेसातीचे पर्व सुरू होत आहे. पण मुळातच ही शनीचीच रास असल्याने तुम्हाला फारसा त्रास होणार नाही. पण काही कामे खोळंबतील. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवून कामे करीत राहाल. साडेसाती असताना काहीजण कशात तरी अडकवण्याचा प्रयत्न करतील. अशा वेळी प्रसंगावधान राखून व्यवहार केल्यास कोणत्याही अडचणी येणार नाहीत. शनीचा जप तप करण्यापेक्षा व्यवहारी बुद्धी वापरून जागरूक राहा. कष्टात कुठेही कमी पडू नका. आपले कर्म म्हणजेच शनी हे लक्षात ठेवा. जर आपले कर्म चांगले असेल तर या साडेसातीच्या काळातच तुमचा सर्व दृष्टीने उत्कर्ष होईल.

या वषीची दोन ग्रहणे अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावतील. 10 फेब्रुवारीचे चंद्रग्रहण वैवाहिक जीवनात किरकोळ वादावादी व संशय निर्माण करेल. 7 ऑगस्टचे तुमच्या राशीत होणारे चंद्रग्रहण मानसिक संतुलन बिघडविण्याची शक्मयता दिसते. साडेसाती सुरू होणार असली तरीही फक्त पहिली अडीच वर्षे काळजी घ्या. तरीही स्वत:चीच रास असल्याने कोणत्याही संकटकाळी त्यातून मार्ग निघेल. त्यामुळे काळजी करू नये, 7 एप्रिलला सुखस्थानी येणारा हर्षल वास्तुच्या बाबतीत आगामी 7 वर्षात काही खळबळ माजवेल. घरातील वातावरण शांत ठेवण्याचे प्रयत्न करा. मातापित्यांची काळजी घ्या. अग्निभय, जळणे, पडणे, अपघात, शॉक लागणे, फटाक्मयामुळे जीवावरचे प्रसंग, राहत्या जागेत बदल, नोकरी व्यवसायात कलाटणी असे प्रकार घडू शकतात. हर्षलचे हे अनुभव आगामी 7 वर्षे जाणवतील. राहू, केतू ऑगस्टनंतर आगामी दीड वर्षे काही ना काही कटकटी निर्माण करत राहतील. विवाह, धनलाभ, संततीसौख्य, व्यावसायिक प्रगती, मानसन्मान, स्ववास्तू वा वाहन यादृष्टीने हे वर्ष अतिशय लाभदायक ठरेल.


मासवार फलप्राप्ती

जानेवारी – मंगळ -केतू -नेपच्यून धनस्थानी असल्याने खर्चात वाढ होईल. कमाई व खर्च यांचा ताळमेळ लागणार नाही. ही संक्रांत वर्षभर तुम्हाला सतत वस्त्रप्रावणांचा लाभ घडवित राहील. खेळ, संगीत व इतर प्रांतात उत्तम यश मिळेल. धार्मिक कृत्यात भाग घ्याल. कोर्ट प्रकरणे यशस्वी होतील. तुमच्या मध्यस्थीमुळे तुटलेले संसार पुन्हा जोडले जातील. साहित्यिक असाल तर नावलौकीक होईल.


 

फेबुवारी – शुक्र, मंगळ, हर्षल पराक्रमात आहेत. उत्साहाने सर्व कार्यात यश मिळेल. लग्नाच्या वाटाघाटी यशस्वी होतील. घर व वाहन आकर्षक ठेवण्याचा प्रयत्न कराल. बुधाचे भ्रमण तुमच्या राशीत होत आहे. लक्ष्मी कृपा राहील. मानसन्मान वाढेल. साध्यासुध्या ओळखीचे रुपांतर प्रेमप्रकरणात होईल. नोकरीसाठी केलेले प्रयत्न सार्थकी लागतील. महाशिवरात्री आरोग्याच्यादृष्टीने अनुकूल आहे.


 

मार्च – शुक्र व मंगळ दोन्हीही बलवान आहेत. त्यामुळे कोणतेही काम कितीही अवघड असले तरी ते यशस्वी कराल. आरोग्य उत्तम राहील. बुध अनिष्ट आहे. लिखाणात गंभीर चुका, त्यामुळे कागदोपत्री घोटाळे दिसून येतील. विसरभोळेपणाचा अनुभव येईल. कोणालाही कोणतीही वस्तू देताना ती लिहून ठेवा. अनिष्टस्थानी होणारी होळी पौर्णिमा कांही समस्या निर्माण करील.


 

एप्रिल – मंगळ-बुध चतुर्थात. काही जणांना संकटातून वाचवाल. सरकारी नोकरी अथवा मदत मिळण्याची शक्मयता. कुटुंबात समृद्धी येईल. चार चाकी वाहन खरेदी करण्याचे योग. वडिलोपार्जित संपत्ती मिळेल. स्वतंत्र उद्योग करण्याची प्रेरणा निर्माण होईल. घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण करू शकाल. कर्जप्रकरणापासून दूर रहा. कोणत्याही अवैध प्रकरणात गुंतू नका. नुकसान होईल.


 

मे – कष्टाने उभा केलेला पैसा इतरांच्या हाती जाणार नाही याची काळजी घ्या. मुलाबाळांचा भाग्योदय होईल. सरकार दरबारी अडलेली कामे होतील. व्यावसाईक क्षेत्रात तेजी जाणवेल. जीवन सुखी आणि आनंदी राहील. अर्थशास्त्र, पत्रकारिता, साहित्य व लिखाणाशी संबंध असेल तर मोठे यश मिळवाल. प्रेमप्रकरणे, जुगार यात नुकसान, पोटाचे विकार उद्भवतील. घाईगडबडीत महत्त्वाच्या वस्तू कोठेतरी विसराल.


 

जून – दुर्दम्य आत्मविश्वासाच्या बळावर न होणारे कामही यशस्वी कराल. पारिवारिक उन्नती होईल. शिक्षणात उत्तम यश. अडकलेली रक्कम परत येईल. विवाह कार्यात यश मिळेल. तीक्ष्ण शस्त्रs, गोळीबार, दगडफेक यापासून जपा. काही धार्मिक कृत्ये केल्यास घराण्यातील दोष कमी होतील. शारीरिक आजार उद्भवतील. कृपथ्य टाळा. असलेली नोकरी बदलू नका.


जुलै – प्रापंचिक जीवनात मतभेद होतील. पशूपक्षी, झाडे, मनिप्लँट व रबर यापासून दूर रहा. ज्या गोष्टींची तीव्र इच्छा असेल ती निश्चित लाभेल. वैवाहिक जोडीदारासाठी खर्च, रहाती जागा अथवा इस्टेटीबाबत समस्या निर्माण होतील. साक्षी पुरावे अथवा कोर्ट मॅटर अथवा जामिनकी आणि विवाहाची बोलणी यात भाग घेऊ नका. उडणारे पक्षी असतील तर त्यांना बंदिस्त करून ठेवू नका, संकटात पडाल. काही जीर्ण महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवा.


 

ऑगस्ट – आर्थिक लाभाच्या अनेक संधी येतील. थोर व्यक्तिंचा सल्ला धुडकावू नका. नशिबाची उत्तम साथ मिळेल. मातापित्यांचे सौख्य चांगले राहिल. मित्र परिवार, धनसंपत्ती याबाबतीत शुभ योग. आर्थिक स्थिती उत्तम असली तरी स्वतःच्या चुकीमुळे नुकसान होण्याची शक्मयता. स्वतःच्या स्वभावात बदल करा. उपकारकर्त्याचे स्मरण ठेवा. त्यामुळे बरेच काही साध्य होईल.


 

सप्टेंबर – अष्टमातील बुध आर्थिक बाबतीत उत्तम आहे. कितीही अडचणी आल्या तरी त्यातून मार्ग निघेल. आजार, त्रास व संकटे निर्माण करणारा हा योग, आरेग्याची काळजी घ्या. कोणाशीही भागीदारी व्यवसाय करु नका. सासरच्या लोकांना मदत करा पण त्यांच्यापासून दूर रहा. घरातील काही वस्तुंची अदलाबदल केल्यास बाधिक दोष कमी होतील. गुप्त कागदपत्रे जपणे आवश्यक.


 

ऑक्टोंबर – जुने कर्ज फेडण्यास अनुकूल काळ. विवाहासाठी अनुकूल काळ, सुवर्णालंकाराची खरेदी होईल. शासकीय मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.  इतरांच्या दु:खाचा विचार करत न बसता स्वतःच्या कुटुंबाकडे लक्ष द्या. फरक पडेल. खोल दरी, डोंगर, पठार यापासून सावध रहाणे आवश्यक. ड्रायव्हिंगसह इतर कोणतीही कला शिकण्यास उत्तम. जर कोणी जुन्या वस्तू दिल्यास त्या घेऊ नका अन्यथा चाललेला व्यवसाय ठप्प होईल. हे वर्ष उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरेल.


 

नोव्हेंबर- ग्रहमान काही बाबतीत अतिशय उत्तम असून बऱयाच शुभ घटना घडतील. कोर्ट प्रकरणात यश मिळवाल. स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळेल. 18 ची अमावास्या मित्रमंडळी व इतरांसाठी मोठा खर्च करण्यास भाग पाडेल. गुरु, शुक्राचे   भ्रमण आर्थिक बाबतीत उत्तम. नोकरीत मानाच्या जागा मिळतील. भरपूर प्रवास योग. व्यापार उदीम व कारखानदारी जोरात चालेल. कोणतेही आर्थिक व्यवहार फायदेशीर ठरतील. वडिलोपार्जित इस्टेटी मिळण्याचे योग. घराण्याचा नावलौकिक काही बाबतीत फायदेशीर ठरेल. कटकटी, अडथळे व अपयश यांच्यावर मात कराल. कालसर्पयोगाचा प्रभाव असल्याने काही शापित दोषांचा परिणाम दिसू लागेल. घराण्यात कोणाच्या पत्रिकेत हा योग असेल तर त्यांनी सावध राहणे आवश्यक.


 

डिसेंबर-पंचमस्थानी होणारी पौर्णिमा मुलाबाळांच्या दृष्टीने भाग्यकारक. बुध, शुक्राचा सहयोग जागेचे व्यवहार पूर्ण करेल. दशमस्थ मंगळामुळे नोकरी व्यवसायात अधिकारपद मिळण्याची शक्मयता. 15 डिसेंबरनंतर रवि, शनिचा अशुभ योग नको त्या कटकटी निर्माण करेल. मानसिक संभ्रम वाढेल. काही किचकट प्रकरणामुळे  नोकरी हातची जाईल की काय, अशी भीती वाटत राहिल. 17, 18 ची अमावास्या मित्रमंडळी व काही नातेवाईकांकडून आर्थिक घोटाळे दर्शवीत आहे. त्यासाठी सांभाळा. तुमचे व्यवहार स्वच्छ असतील व सावध राहिलात तर तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही.