|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » भविष्य » मीन

मीन 

कालपुरुषाच्या कुंडलीत  पायावर अंमल असणारी रास म्हणजे मीन. जलाशय, नद्या, समुद्र यावर अंमल. ठाम निर्णय घेऊ शकत नाहीत. कोणाच्याही स्तुतीला चटकन भाळतात वा फसतात. सौम्य स्वभाव असला तरी सिंह, गाय व हत्ती या योनीदेखील याच राशीखाली येतात. पाण्याप्रमाणे शितल, शांत व सोशिक स्वभाव असतो. त्यामुळे कोणीही गैरफायदा घेणार नाहीत याची काळजी घ्या. मनुष्यगण व देवगण यांचा प्रभाव असल्याने सात्त्विक वृत्ती असते. भगवान शिव व प्रभू रामचंद्र तसेच आदिशक्तीची विशेष कृपा या राशीवर असते. या वर्षात दोन चंद्रग्रहणे गुरु, शनि, हर्षलचे राश्यांतर राहू, केतूचे स्थानपालट यांचा विशेष प्रभाव या राशीवर राहील. 10 फेब्रुवारीचे चंद्रग्रहण पंचमस्थानी होत आहे. आध्यात्मिक बाबतीत चांगले परंतु मुलाबाळांच्याबाबत चिंताजनक. 7 ऑगस्टचे चंद्रग्रहण लाभस्थानी आहे. समृद्धी, धनलाभ, मानसन्मान या दृष्टीने उत्तम ठरेल. राहू, केतूचे राश्यंतर शापित दोष निर्माण करणारे आहे. एप्रिलमध्ये हर्षल धनस्थानी येत असून 7 वर्षे त्याचा मुक्काम तेथे राहील. आगामी कालखंडात कोठेही गुंतवणूक करताना काळजी घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवून पैसा राखून ठेवा. उजव्या डोळय़ाची काळजी घ्या. हर्षल हा ध्यानीमनी नसता अघटित घटना घडवितो. त्यामुळे सावध राहणे हा त्यावरचा उपाय आहे. कोणावरही पटकन विश्वास ठेवणे हा तुमचा गुण पण त्यामुळे तुम्ही संकटात येता. आंब्यासारखे गोड व कडुलिंबासारखे कडू व मोहकपणा या तिघांचेही मिश्रण तुमच्यात आहे. कोणत्यावेळी कोणता मुद्दा वापरायचा हे ठरविल्यास व चंचलपणा ओढल्यास जीवनात नेहमी यशस्वी व्हाल. कोलेस्टेरॉल  वाढणे हा तुमचा नैसर्गिक गुणधर्म आहे. त्यामुळे नियंत्रण ठेवा. कर्तव्य व भावनाशिलता यांचा योग्य समन्वय साधण्याचा प्रयत्न करा. म्हणजे अडचणी उद्भभवणार नाहीत. पिवळा रंग, दत्तगुरुची उपासना व महादेवाचा आशीर्वाद यांच्या जोरावर बरेच काही साध्य करू शकाल.

जगातील मोठमोठी जलाशये, समुद्री व्यवहार, सागर आपली उच्चराशी मानलेली आहे. सागरी संपत्ती, जलसंपदा, सत्ता, जलचर, जलतत्व, सागर कन्या, लक्ष्मीचा आशीर्वाद, आर्थिक सुबत्ता, मनाचा कोमलपणा, उत्तर व ईशान्य दिशा यावर अंमल असणारी रास म्हणजे मीन.  राशीस्वामी गुरु हा संपत्तीकारक असून या राशीत 27 अंशावर शुक्र असेल तर नशिबाची साथ निश्चितपणे मिळणार व श्रीमंती अथवा सौंदर्य यापैकी काही तरी लाभ होणारच याची हमी देणारी ही रास आहे. माणूस कितीही मोठा असला तरी त्याचे पाय जमिनीवर असावेत. काळ , वेळ,सत्ता व पैसा यांच्याशी कधीही मस्ती करू नये, हे शिकविणारी ही रास आहे. बृहस्पती हे देवांचे तर शुक्र हे राक्षसांचे गुरु.. म्हणून शुक्र व गुरु या दोन ग्रहांचे पटत नाही पण मृत्युलाही जिंकणाऱया दैत्यगुरु शुक्राचार्यानी गुरुच्या मीन राशीला आपली उच्च राशी मानलेली आहे. सात्त्विकवृत्ती, दैवी -सौंदर्य, आईची ममता , सर्व तऱहेची रत्ने, जलपर्यटन, अंमली पदार्थाची व्यसने, चराचर सृष्टीला आधार देणारे पाय यावर या राशीचा अमल आहे. जीवघेणी युद्धे, एखाद्याला वश करून त्याच्याकडून आपली कामे  करून घेणं, शारीरिक आकर्षण याही बाबी याच राशीखाली येतात. प्रसंगी वाघ वाघिणीसारखा उग्र अवतार धारण करून भल्या भल्यांना पाणी पाजू शकतात. शनिची कष्ट करण्याची वृत्ती, बुधाचे व्यवहार चातुर्य व चंचलपणा, बृहस्पतीचे व्यवहार चातुर्य, औषधी कडूपणा, दुधाचा पौष्टिकपणा, हत्तीची संयमी वृत्ती, पावित्र्य यांचे सरमिसळ घेऊन ही रास आलेली आहे. व्यसनापासून कायम दूर राहावे अन्यथा उतरत्या काळात यांचे हाल  होतात व संपत्तीला उतरती कळा लागते. ‘स्वत:च्या कर्मातच परमेश्वर आहे सतत काम करीत रहा. तीच खरी पूजा आहे,’ असा संदेश देणारी ही रास आहे. सर्व चराचरसृष्टी व सजीवाला असलेली गती म्हणजे मीन रास. जीवनातील सर्व घडामोडींचा भार आपल्यावर घेण्याची क्षमता असलेल्या या राशीला अजिबात कमी लेखता येत नाही. समुद्र, मोठमोठे सागर, महासागर, भरती-ओहोटी, शिशिर ऋतू सर्व तऱहेचे द्रवपदार्थ व्यसने यावर या राशीचा अंमल असतो. पुष्कराज, जहाजं बोटीवरील कॅप्टन, पायाभूत व्यवस्था या सर्वांचे सरमिसळ असणारी ही रास आहे. या राशीवर लक्ष्मीची खास कृपा. कारण लक्ष्मी ही सागर कन्या आहे. या मीन राशीच्या लोकांच्या पोटात कोणत्याही गुप्त गोष्टी रहात नाहीत. मीन राशीची माणसे कितीही श्रीमंत असली तरी हाती पैसा अजिबात टिकत नाही. मीन राशीची माणसे फार लवकर व्यसनाच्या आहारी जातात. प्रेमप्रकरणातदेखील लवकर पडतात. हत्ती, गाय, सिंह हे प्राणी या राशीखाली येतात. फाल्गुन महिना, आश्लेषा नक्षत्र व शुक्रवार या राशीला मानवत नाही. गुरुचा सात्विकपणा, हुशारी, तडजोड करण्याची वृत्ती, शनिचा मुत्सद्दीपणा, बुधाचा चावटपणा हे सारे गुणही या राशीत दिसून येतात. मीन राशीच्या व्यक्ती बोलण्या चालण्यातून इतरांचे लक्ष आपल्याकडे आकर्षून घेतात व गोड बोलून आपली कामं करून घेतात. भांडणे चालू असतील तर मध्यस्थीचे कामही ते चांगले करू शकतात.

शनि वर्षभर जानेवारीपर्यंत भाग्यात व त्यानंतर काही काळ दशमात राहील. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. भागीदारी व्यवसायात लाभ. नोकरीत भाग्योदय होईल. सर्व तऱहेच्या अपघातापासून जपावे. नशापाणी, साप, विंचू यापासून जपा. शनिच्या वस्तुचे दान केल्यास अशुभ परिणाम टळतील. परोपकारी वृत्ती असेल तर शुभ फळे मिळतील. घरात जर कुणी गर्भवती असेल तर घर बांधायला काढु नका. उच्च शिक्षणात चांगले यश मिळेल. नोकरी व्यवसायानिमित्त सतत प्रवास करावे लागतील. इतरांचा मान राखाल तर स्वत:चा मानमरातब वाढेल. जीवनात सर्व प्रकारे आराम व सुख समाधान राहील. या शनिच्या कालखंडात मुक्मया प्राण्यांची हत्या करू नका. अन्यथा आर्थिक स्थितीवर अनिष्ट परिणाम होईल. सप्टेंबरपर्यंत राहू 12 वा व केतू सहावा राहील. परदेश प्रवासाच्या संधी येतील. मोठमोठय़ा संकटातून बचाव होईल. ऐषआरामाची साधने खरेदी कराल. जर एखादे पद मिळाले तरी त्याचा फायदा इतर लोक घेण्याची शक्मयता. कोर्टकचेरीचे निकाल अनुकूल लागतील. शत्रू थंड राहतील. जीवनात महत्त्वाचे चढउतार होतील. भावाबहिणींना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घ्या.

राशीस्वामी गुरु सप्टेंबरपर्यंत सप्तमात आहे. वैवाहिक जोडीदार सतत राजकारण व समाजकार्यात गुंतत असल्याने सांसारिक जीवनात जरा धुसफूस राहील. नोकरी, उद्योग व्यवसायात दलाली, मध्यस्थी यातून धनलाभ होत राहतील. वडील व सासरे यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

धनलाभाच्या अनेक संधी येतील. सरकारी कामात चांगले यश मिळवाल. मानसन्मान व वाहन सौख्य लाभेल. जर पुत्रजन्म झाला तर भाग्योदय सुरू होईल. तसेच सर्व कामात यश मिळवाल.

प्रजापती हर्षलमुळे प्रेमप्रकरणे निर्माण होतील. भाग्यशाली असाल तर त्याचे विवाहात देखील रुपांतर होईल.

प्लुटो यावषी दशमात आहे. नोकरी व्यवसायात उच्चपद, स्वतंत्र व्यवसायात यश देईल. राजकारणात असाल तर मोठे पद मिळवू शकाल.


 

जानेवारी 2017- शुक्र, केतू, नेपच्यून 12 व्यास्थानी आहेत. हौसमौज चैन यासाठी खर्च होईल. संसारिक जीवनात किरकोळ कारणावरून मोठे वादंग माजेल. प्रकरण विकोपाला जाऊ देऊ नका. कोर्टकचेरीची प्रकरणे मागे लागतील. प्रकृतीच्या किरकोळ तक्रारी निर्माण होतील. पण त्याची भयानक भीती घालण्याचे प्रकार घडतील. जर लग्नाच्या वाटाघाटी अथवा प्रत्यक्ष लग्न ठरत असेल तर अचानक धनलाभ होऊ लागतील. ऐषाराम वाढेल. सामाजिक क्षेत्रात चांगले यश. चांगल्या घराण्याशी विवाह जुळेल. नवनवीन खरेदीमुळे घर भरून जाईल. श्रीमंतांचे चांगले सहकार्य मिळेल. मित्रमंडळी देवासारखी सतत पाठराखण करतील.


फेब्रुवारी-महाशिवरात्री लाभात होत आहे. मोठा धनलाभ होऊ शकेल. शुक्र, मंगळाची युती  भाग्योदयकारक आहे. आतापर्यंत रेंगाळलेली मोठी कामे होऊ लागतील. वैवाहिक जीवन सुखी व समृद्ध राहील. कोणत्याही बाबतीत कुणाचेही मन दुखवू नका. आरोग्य उत्तम राहील. महत्त्वाची सर्व कामे या महिन्यात करून घ्यावीत. अकरावा रवी नोकरी व्यवसायासह सर्व बाबतीत सहकार्य करील. अचानक लाभ होण्याचे योग दिसतात. विद्यार्थ्यांना शिक्षणात चांगले यश मिळेल.


मार्च- 9 तारखेचा गुरुपुष्यामृत योग. दैवी कृपा अथवा साहाय्य मिळवून देईल. 12 तारखेची होळी पौर्णिमा आरोग्याच्या तक्रारी व शत्रुपीडा दर्शविते. काळजी घ्यावी. आर्थिक लाभ उत्तम, खर्चही आटोक्मयात ठेवावे लागतील. नोकरी व्यवसाय व महत्त्वाच्या चर्चेच्यावेळी, स्वत:चे विचार बाजूला ठेवावे लागतील. तुमच्या काही वक्तव्याचा अथवा चुकांचा तसेच रागाचा गैरवापर होण्याची शक्मयता आहे. कोणतेही काम मन शांत ठेवून व स्वत:च्या बुद्धीनेच करावे लागेल.


एप्रिल- रविचे परीभ्रमण डोळय़ांचे विकार निर्माण करील. महत्त्वाची जबाबदारी स्वीकारावी लागेल. मनावर नियंत्रण ठेवाल तर सर्व काही मनासारखे होईल. देणीघेणी, प्रवास व वाटाघाटी या बाबतीत कुणावर अती विसंबून राहू नका. चांगल्या मार्गाने धनलाभ होतील. इतरांना कठीण वाटणारी कामे तुम्ही करून दाखवाल. त्यामुळे प्रतिष्ठा वाढेल. योग्यवेळी अधिकाराचा वापर करण्याची संधी मिळेल. मेमध्ये आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगावी. कुणी कितीही नाटके केली तरी उसनवार पैसे देऊ नका. पैसे अडकण्याची शक्मयता आहे.


मे-बरेच दिवस दूर असलेल्या मित्रमैत्रिणी भेटतील. त्यांच्यामुळे नवीन महत्त्वाच्या कल्पना तसेच उद्योगासाठी नवीन धोरणे समजतील. अडकलेल्या सरकारी कामांना गती मिळेल. हरवलेल्या वस्तू अथवा व्यक्ती परत येण्याची शक्मयता. रहात्या वास्तुसंदर्भातील वाद मिटतील. कोर्टमॅटरमध्ये शक्यतो गुंतू नका. ऐनवेळी नको ती प्रकरणे डोकेदुखी निर्माण करतील व नुकसान होईल. वाहन जपून चालवा.


जून-मंगळाच्या भ्रमणामुळे आर्थिक आवक कमी राहील. नवनवीन येणारे पै पाहुणे, आजारपण, वाहन दुरुस्ती यासाठी खर्च होईल. कुणाचेही मन न दुखविता कामे करून घ्या. चेक, प्रॉमिसरी नोटा वगैरेवर सही करताना अथवा लिखाण करताना काळजी घ्यावी लागेल.  काही दिवस स्थलांतर करा. बराच फरक पडेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. 20, 22 दरम्यान महत्त्वाच्या घटना घडतील. लग्नाच्या वाटाघाटी सुरू करा. यश मिळेल. मुलाबाळांच्या शिक्षणाचा प्रश्न मिटेल.


जुलै-ऐनवेळी कामाच्या वस्तू अथवा साहित्य बिघडल्याने त्याचा परिणाम दैनंदिन कामावर होईल. अडचणी आल्या तरी यातून मार्ग निघेल. शनि, मंगळाचा योग साध्यासुध्या गोष्टीवरून गंभीर प्रश्न निर्माण करू शकेल. वाहन जपून चालवा. गुरु अनुकूल आहे. तोपर्यंत विवाह, साखरपुडा, भागीदारी व्यवसाय व दूरचे प्रवास , नवीन खरेदी, विक्री, कर्जफेड करून घ्या. बँका, कारखानदारी, अकौंटन्सी, कंपन्या, वाहन व्यवसाय यांच्याशी संबंध असेल तर चांगली प्रगती होईल. ऐषआरामी जीवन जगण्याची हौस पूर्ण करू शकाल. सहलीचे नियोजन होईल. शिक्षण चालू असेल तर अवघड विषय सुटतील. सर्व कामात परमेश्वरी सहकार्य मिळेल.


ऑगस्ट- पंचमात मंगळ आहे. संततीची काळजी घ्या. कमाईचे नवे मार्ग दिसतील. नोकरी व्यवसाय अथवा इतर कामासाठी अचानक प्रवास करून घ्या. कळत नकळत झालेल्या  काही चुका निस्तरण्याची संधी मिळेल. त्यातून पुढे फायदाही होईल. वारंवार प्रवास घडतील. घरात जर लिंबाचे झाड लावल्यास त्याचे उत्तम अनुभव येतील. वडिलोपार्जित इस्टेट असेल तर ती जतन करण्याचा प्रयत्न करा. संधीवात, पित्त, अपचन यापासून जपा.


सप्टेंबर- 12 तारखेला गुरु आठवा येत आहे. जीवावरच्या कोणत्याही संकटातून बचाव होईल. अथवा ऐनवेळी कुणाची तरी मदत मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. दैवी कृपेने अनपेक्षितरित्या धनलाभ, महत्त्वाच्या कामात यश मिळेल. कमाई चालू असली तरी काहीवेळा कर्ज काढावे लागेल. मामाच्या घरातून जर शनि, मंगळाच्या वस्तू घेतल्यास मोठय़ा संकटात पडाल. या गुरुमुळे वर्षभर जीवन  संघर्षमय राहील. अति उत्साहामुळे नको ती संकटे ओढवून घ्याल. योग्य कारणासाठी बराच खर्च होईल.


ऑक्टोबर-सप्तमात येणारा मंगळ वैवाहिक जीवनात कटुता निर्माण करील. त्यासाठी सावध रहा. भागीदारी व्यवसाय असतील तर हिशोब व्यवस्थित राहतील. याकडे लक्ष द्या. बुध आठवा येत आहे. आजारपणात खर्च, कामात अडथळे उद्भवतील. दुसऱयांचे त्रास, पीडा व संकटे स्वत:वर ओढवून घेऊ नका. शुक्र सप्तमात येत आहे. वैवाहिक जीवन चांगले राहील. मित्र मंडळीशी जेवढय़ास तेवढेच संबंध ठेवावेत. कौटुंबिक गुप्त गोष्टीची वाच्यता करू नका. कमाई -वरप्राप्तीचे मार्ग गुप्त ठेवा, म्हणजे काहीही त्रास होणार नाही.


नोव्हेंबर- रवी, गुरु, शुक्र अष्टमात हा योग आर्थिक बाबतीत अतिशय उत्तम परंतु काही दोषही निर्माण होतील. मंगळाचे भ्रमण वैवाहिक जीवनात खळबळ माजवेल. अपघातभय व गैरसमजांना वाव मिळेल. काहींना काही चमत्कारीक घटना घडून नोकरी व्यवसाय व राजकारणात उच्चाधिकार प्राप्त होईल. रवी, बुधाचे भाग्यातील भ्रमण शिक्षणात उत्तम यश देईल. नावलौकिक होण्याचे योग. उद्योग व्यवसायात मनासारखी प्रगती. मंगल कार्यासाठी प्रवास योग येतील. मोठमोठे व्यवहार करण्याची संधी मिळेल. अमावस्येदरम्यान आरोग्याची काळजी घ्या. 9 तारखेचा गुरुपुष्यामृत योग मुलाबाळांच्यादृष्टीने भाग्योदयकारक आहे.


डिसेंबर-मंगळाचे भ्रमण शुभ नाही. अपघातयोग असल्याने वाहन जपून चालवा. मानसिक ताणतणाव वाढेल. रवी, शनि, बुध यांचा योग काही अंशी गोंधळ निर्माण करणारा आहे. नोकरीची संधी मिळणार असे वाटतानाच असलेली नोकरी गमावण्याची वेळ येईल. त्यासाठी सावध रहा. मालकाशी अथवा वरि÷ांशी चुकूनही हुज्जत घालू नका. खरेदी विक्री व्यवहार डोळसपणे करावे लागतील. एखाद्या चुकीच्या कागदपत्रामुळे गोत्यात येऊ शकाल. धार्मिकतेकडे विशेष लक्ष द्या. अनोळखी व्यवसायात गुंतवणूक करणे टाळा. कोणतीही नवीन जबाबदारी घेताना किंवा किंमती वस्तू सोपवताना सावधानता बाळगा.

Related posts: