|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » माळशिरस मध्ये आज मोर्चाची हॅट्रीक

माळशिरस मध्ये आज मोर्चाची हॅट्रीक 

प्रतिनिधी/ माळशिरस

आज नोटाबंदीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे रास्ता रोको, काँग्रेसचा घंटानाद तर शेतकरी संघटनेचे थकीत ऊस बिलासाठी आंदोलन अशी तीन पक्षांनी आज तहसील कार्यालयासमोर आंदोलन छेडले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नोटा बंदीत सरकारणे मोठे नुकसान केले असून याचा सर्वात मोठा फटका सर्वसामान्यांना बसला आहे. कोणतीही पुर्व तयारी न करता घेतलेल्या या निर्णयामुळे ही वेळ सर्वांवर आली असल्याचे मत तालुक्याचे आ. हनुमंत डोळस यांनी व्यक्त केले यावेळी अनेकांनी आपल्या मनोगतात या निर्णयावर टिकेचे झाड उठवली होती यावेळी मदतसिंह मोहिते-पाटील, धैर्यशील मोहिते-पाटील, आप्पासाहेब देशमुख, गणपतराव वाघमोडे, सुनिता ठोंबरे, राहूल वाघमोडे, संग्रामसिंह जहागीरदार, विष्णू केमकर, अशोक देशमुख, मामा पांढरे, मिलींद कुलकर्णी, अमीर पठाण, आकाश सिद, धनाजी देवकर, लाला बाजरे आदी मान्यवर उपस्थित होते.

नोटाबंदी विरोधात काँग्रेसचे तहसिलदारांना निवेदन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक पाचशे व हजार रुपयांच्या नोटाबंदी केल्याने सर्व सामान्य माणसाला नाहक मनस्ताप सहन करावा लागला असून हक्काचे पैसे असूनही वेळेवर मिळत नाहीत त्यामुळे सर्व सामान्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मोदींच्या नोटाबंदीच्या विरोधात माळशिरस तहसीलदार बी.एस. माने यांना काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद करीन निवेदन देण्यात आले. यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष शिरीष फडे, शंकरनाना देशमुख, प्रा. भरत गायकवाड, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष संतोष पवार, श्यामराव बंडगर, अमोल पाटील, यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, मोदी सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेऊन संपूर्ण देशभरातील जनतेला वेठीस धरले आहे. नोटाबंदीचा निर्णयाला 50 दिवस उलटून गेले तरी बँकांमध्ये पुरेशी रोकड शिल्लक नाही यामुळे जनतेला त्रास होत आहे हे सर्व लक्षात घेऊन मोदी शासनाच्या जनविरोधी धोरणाच्या विरोधात देशभर आंदोलन करण्याची भुमिका अखिल भारतीय काँग्रेसने घेतला असून त्यानुसार माळशिरस तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करुन शासनाचा निषेध करण्यात आला.

शंकर सहकारीचे थकीत ऊस बिले मिळावे.

2014-15 या वर्षात गळीतास गेलेल्या शेतकऱयांची ऊस बिलाची 27 कोटी 50 लाख रुपये थकबाकी त्वरीत मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने अनेक दिवसापासून वेगवेगळी आंदोलने केली जात आहेत. अनेक वेळा आश्वासने मिळाली मात्र बिल अद्याप मिळाले नाही. कारखान्याचे चेअरमन व संचालक मंडळावर गुन्हे दाखल होऊन आमची ऊस बिलाची रक्कम त्वरीत मिळावी यासाठी शेतकरी संघटनेचे व मित्रपक्षाने रास्ता रोको करुन आपल्या मागण्यांचे निवेदन तहसिलदार बी.एस. माने यांना दिले. यावेळी प्रकाश पाटील, जयंत बगाडे, दिपक भोसले, सुरेश टेळे, पांडुरंग वाघमोडे, भानुदास सालगुडे, लक्ष्मण गोरड, विष्णू गोरड, दादासाहेब वाघमोडे, मारुती पाटील, सचिन पडळकर, अण्णासाहेब रुपनवर, भिमराव फुले, शुभम सुळ, विलास पाटील, महादेव सावंत, पांडुरंग फुले आदी मान्यवर उपस्थित होते.

Related posts: