|Saturday, August 12, 2017
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पणजीच्या रिंगणात उतरले राजूभाई सुकेरकरपणजीच्या रिंगणात उतरले राजूभाई सुकेरकर 

गोवा सुरक्षा मंचतर्फे उमेवारी जाहीर

प्रतिनिधी/ पणजी

गोवा सुरक्षा मंच हा तत्वनिष्ठ, मूल्याधिष्ठीत, गोव्याचे हितरक्षक व सेवाभावी पक्ष आहे. आमचा पक्ष अस्तित्वात येऊन केवळ दोन महिने झाले असले तरीही केवळ दोन महिन्यांच्या कालावधीत पक्ष संपूर्ण गोव्यात प्रसिध्द झालेला आहे, असे सांगून गोवा सुरक्षा मंचाचे अध्यक्ष आनंद शिरोडकर यांनी पक्षातर्फे पणजी मतदारसंघातून समाजसेवक, उद्योजक तथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक कृष्णराज उर्फ राजुभाई सुकेरकर यांची उमेदवारी जाहीर केली.

 

पणजीचे उमेदवार म्हणून कृष्णराज उर्फ राजू सुकेरकर यांच्या नावाची  घोषणा झाल्यानंतर काल सोमवारी पहिल्यांदाच त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

 पणजीतून निवडून येणार

आपल्यासमोर दिग्गज राजकारणी नेते प्रतिस्पर्धी म्हणून उभे असल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना सुकेरकर म्हणाले की कितीही अनुभवी उमेदवार असले, तरीही निवडणूक ही शेवटी निवडणूक असते. मतांची मोजणी होऊन कोण जिंकलेला आहे हे कळेपर्यंत कुठलाही उमेदवार आपणच जिंकणार हे छातीठोकपणे सांगू शकत नाही. मोठमोठय़ा दिग्गज राजकारणी नेत्यांनाही आपण निवडून येऊ की नाही याची शाश्वती देता येत नाही. मात्र पणजीची यावेळची निवडणूक इतिहास घडविणारी ठरणार असून त्यात पणजीकरांचा स्पष्ट कौल आपल्याला मिळणार आहे, असा विश्वास सुकेरकर यांनी व्यक्त केला.

 

फळा हे चिन्ह मिळाल्याचे समाधान

यावेळी अध्यक्ष आनंद शिरोडकर पुढे म्हणाले की पक्षाचे नोंदणीकरण 3 जानेवारी 2017 या दिवशी पुर्ण झाले. निवडणूक आयोगाकडून आम्हाला देण्यात आलेल्या 10 चिन्हांपैकी शैक्षणिक फळा या चिन्हाला आम्ही सर्वात जास्त प्राधान्य दिले होते. हेच चिन्ह मिळावे अशी शिफारसही केली होती. अपेक्षेप्रमाणे हेच चिन्ह मिळाल्याने आम्हाला समाधान आहे. फळा आणि शिक्षण या दोन्ही गोष्टींचा फारच घनिष्ठ संबंध आहे, असेही ते म्हणाले.

जनता आमच्या महायुतीला सत्ता देणार

फळा हे चिन्ह संपूर्ण राज्यभरात प्रसिध्द करण्यासाठी पक्षाला पुरेसा वेळ असल्याचे शिरोडकर यांनी सांगितले. आपल्या पक्षाला प्रसिध्दी मिळण्यात वृत्तपत्रे व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा महत्वाचा सहभाग असल्याने आपण सर्व माध्यमांचे आभार मानत असल्याचे शिरोडकर म्हणाले. राज्यातील जनता आपल्या पक्षाचे स्वागत करेल याबाबत आपल्याला अजिबात शंका वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले. गोवा सुरक्षा मंच, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, शिवसेना आणि गोवा प्रजा पक्ष या पक्षांच्या महायुतीला मतदान करून जनतेने पक्षाला सत्तेवर आणावे, असे आवाहन त्यांनी केले.

राजूभाई अजातशत्रू व्यक्तिमत्व 

कृष्णराज उर्फ राजूभाई सुकेरकर यांच्याबद्दल बोलताना शिरोडकर म्हणाले की राजूभाई हे अजातशत्रू व्यक्तिमत्व आहे. समाजसेवक, जमिनदार, उद्योजक असलेले सुकेरकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या उत्तर गोवा जिल्हा संघचालक या पदाची जबाबदारीही सांभाळलेली आहे. अनेक वर्षे तरूण पिढीला व्यसनापासून मुक्त करण्याचे कार्य केलेले आहे. आज एखाद्या पक्षाचे तिकीट मिळावे यासाठी स्पर्धा व चढाओढ लागलेली असताना सुकेरकर यांना मात्र पक्षाची उमेदवारी घेण्यासाठी त्यांना आग्रह करण्याची वेळ आली, असे शिरोडकर यांनी सांगितले.

 पत्रकार परिषदेला व्यासपीठावर पक्षाच्या उपाध्यक्ष श्रीमती स्वाती केरकर, खजिनदार महेश म्हांब्रे व संयुक्त सचिव नितीन फळदेसाई उपस्थित होते. 

 

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!