|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » विविधा » सांगलीत साकारणार जगातील पहिले ‘बुध्दिबळ भवन’

सांगलीत साकारणार जगातील पहिले ‘बुध्दिबळ भवन’ 

ऑनलाईन टीम / सांगली : 

लवकरच जगातील पहिले ‘बुध्दिबळ भवन’ अनेक नामांकित बुध्दीबळपटूंना घडविणाऱया सांगलीत साकारले जाणार आहे. 25 हजार चौरस फुटातील प्रस्तवित इमारतीस बुध्दिबळाच्या पटाचे स्वरूप देण्यात येणार आहे.

एकाचवेळी 500 खेळाडूंच्या स्पर्धेची तसेच आंतरराष्ट्रीय सामन्यांची व्यवस्था येथे उपलब्ध हेणार आहे. 1941 मध्ये बुध्दीबळाचे भीष्माचार्य दिवंगत भाऊसाहेब पडसलगीर यांनी स्थापन केलेल्या येथील नूतन बुध्दीबळ मंडाळाला यंदा 75 वर्ष पूर्ण झाली असून या मंडाळाने राज्य, राष्ट्रय स्पर्धाची पन्नास वर्षाची अखंड परंपराही जपल्याने संपूर्ण बुध्दीबळ विश्वात सांगलीचे नाव कोरले जाणार आहेत.