सौरभ गांगुलीला जीवे मारण्याची धमकी

वृत्तसंस्था/ कोलकाता
टीम इंडियाचा माजी कर्णधार व बंगाल क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष सौरव गांगुलीला जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र मिळाले आहे. मिदनीपूर विद्यापीठातील कार्यक्रमात सहभागी झाल्यास जीवे मारण्यात येईल, असे या पत्रात म्हटले आहे. 7 जानेवारी रोजी धमकीचे पत्र मिळाले होते. मी याबाबत पोलिसांना व कार्यक्रमाच्या आयोजकांना याबाबत माहिती दिली आहे, असे गांगुलीने सांगितले. 19 जानेवारी रोजी मिदनीपूर विद्यापीठात एका क्रीडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पंरतु या कार्यक्रमात सामील होण्याबाबत त्याने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.