|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » कर्मचाऱयांच्या कलाविष्कारला सांस्कृतिक महोत्सवातून प्रेरणा

कर्मचाऱयांच्या कलाविष्कारला सांस्कृतिक महोत्सवातून प्रेरणा 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

 कर्मचाऱयांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचे काम सांस्कृतिक महोत्सवातून होते.  नाटय़, गायन व संगीत अशा विविध क्षेत्रामधील त्यांची कला यामधून सर्वांना अवगत होत असल्याचे प्रतिपादन प्राप्तिकराचे महानिदेशक (पुणे) आर.के. गुप्ता यांनी केले.

 प्राप्तिकर विभाग आणि सेंट्रल रेव्हिन्यू स्पोर्टस् अँड कल्चरल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी दि.9 शाहू स्मारक भवनात उपविभागीय सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.

   यावेळी पुणे प्रधान मुख्य प्राप्तिकर आयुक्त शबरी भट्टासाली म्हणाल्या, महोत्सवाच्या माध्यमातून घेण्यात येणाऱया विविध स्पर्धा कर्मचाऱयांना प्रेरणा देण्याचे काम करतात. दररोज काम करणारे कर्मचारी अशा महोत्सवाच्या माध्यमातून तणावमूक्त होतात.

 दुसऱया सत्रामध्ये विविध स्पर्धेतील पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रधान प्राप्तिकर आयुक्त 2 एम.एल. करमाकर, मनपा आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार, प्रिंसिपल चिफ मॅनेजर दिपक परब, कोल्हापूर प्राप्तिकर आयुक्त अपील 1 शिवराज मोरे, प्राप्तिकर आयुक्त 2 अमोल कामत, डॉ. यु. एन. बिडकर यांच्यासह सेंट्रल एक्साईज, कस्टम व प्राप्तिकर विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

        आपलेच लोक असल्याचा विश्वास बसत नाही 

नाटक पाहताना वाटलेच नाही की हे आपल्यातलेच लोक आहेत. हे तर याच क्षेत्रातले तज्ञ असल्याचे दिसून आले. नाटकामधील विषयही चांगले निवडले असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी केले. नवीन वर्षाच्या तयारीसाठी व शासकिय निर्णयासाठी सारे सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले.

    नागपूर विभागाची बाजी

 दिवसभरात नाटक, नृत्य, लोकगीत, संगीत, समुह नृत्य अशा विविध स्पर्धा झाल्या. यामध्ये नागपूर विभागाने बाजी मारली. यात वैयक्तीक नृत्य स्पर्धेत ज्योती साळवे यांनी प्रथम आणि आशा उंबळे यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. नाटकामध्ये ‘जन्मजन्मांतर’ या नाटकास प्रथम क्रमांक मिळाला. तर हिंदीमधून पराजय या नाटकाने क्रमांक पटकावला. समुह नृत्यामध्ये चिफ कमिशनर ऑफ सेन्ट्रल एक्साइज कस्टम ऍन्ड सर्विस नागपुरच्या ग्रुपने प्रथम पारितोषिक मिळवले. संगीतामध्ये एन. डी. पाठक यांनी प्रथम तर एम. डी. नाईक यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. तसेच निरज शंकर यांनी क्लासिकल हिंदुस्थानीमध्ये यश संपादन केले. रविंद्रकुमार शर्मा यांनी वाद्यवृंद यात प्रथम आणि एन. डी. जोशी यांनी द्वितीय खढमांक मिळवला. यावेळी सुत्रसंचालन वर्षा देशपांडे यांनी तर विजय नेटके यांनी आभार मानले.