|Saturday, July 29, 2017
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » गडकोट किल्ल्यांचे संवर्धन काळाची गरजगडकोट किल्ल्यांचे संवर्धन काळाची गरज 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

कामाच्या व्यापातून व ताणतणावातून बाहेर पडण्यासाठी पर्यटनाकडे वळावे लागते. निसर्गाचा शोध घेत जगणे व स्वत:ला घडविणे म्हणजे जीवन आहे. भारतामध्ये तीर्थक्षेत्राच्या भेटीतून पुर्वीपासून पर्यटन सुरू होते. आजही लोक देवदर्शनाला जातात, भटकंती केल्यने नवी माहिती लोकांना मिळते. शिवछत्रपतींनी स्वराज्य निर्मितीतून गडकोट किल्ले निर्माण केले, या  गडकोट किल्ल्यांचे संवर्धन ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी समन्वयक डॉ. सुधीर इंगळे यांनी केले.

विवेकानंद कॉलेजमध्ये डॉ. शहाजीराव देशमुख लिखित ‘महाराष्ट्र पर्यटन’ या विषयावरील तीन पुस्तकांचे प्रकाशन विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी चौधरी यात्रा कंपनीचे ब्रीजमोहन चौधरी, डॉ. ए. एम. नवले, डॉ. सुधिर इंगळे, डॉ. ए. एम. गोफणे आदी मान्यवर उपस्थित होते.

संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य साळुंखे म्हणाले, जगात ज्या गोष्टी नाहीत त्या भारतात आहेत. महाराष्ट्रातील गडकिल्ल्य़ांना ऐतिहासिक महत्व आहे. इतिहासातील गडकिल्ले, समुद्र किनारे, खनिज संपत्ती, धार्मिक स्थळे, मंदिरे, यातून आतल्या देशात पर्यटनासाठी खूप संधी आहे. त्यामुळे भारतातील लोकांना आपल्या देशातील स्थळांना भेटी देऊन संस्कृती जाणून घेणे गरजेचे आहे.

डॉ. ए. एम. नवले, ब्रीजमोहन चौधरी, डॉ. ए. एम. गोफणे यांनी मनोगत व्यक्त केले. पुस्तक प्रकाशनासाठी श्रीकांत देसाई, सिध्दार्थ घाटगे यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. पाहुण्यांचे स्वागत डॉ. वत्सला देशमुख यांनी केले. पाहुण्यांची ओळख डॉ. राजाराम माने यांनी करून दिली. अशोक भोईटे यांनी सुत्रसंचालन केले. डॉ. डी. सी. कांबळे यांनी आभार मानले. यावेळी शिवाजी विद्यापीठ परिक्षत्रातील प्राध्यापक, देशमुख कुटुंबिय, विद्यार्थी आदी उपस्थित होते.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!