|Sunday, July 30, 2017
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » सुदृढ आरोग्यासाठी रोज व्यायाम, खेळासाठी वेळ काढासुदृढ आरोग्यासाठी रोज व्यायाम, खेळासाठी वेळ काढा 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

रोजच्या धकाधकीच्या काळात आरोग्य सुदृढ ठेवणे सर्वांसाठी महत्वाचे झाले आहे. तेव्हा रोज एक तास व्यायाम व खेळासाठी दिल्यास आरोग्याचे बरेच प्रश्न सुटतील, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष विमलताई पाटील यांनी केले.

जिल्हा परिषद आयोजित जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. पोलीस परेड मैदानावर सोमवारपासून सुरु झालेल्या या स्पर्धेचे पाटील यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलीत करुन  उद्घाटन करण्यात आले. यानंतर क्रीडाध्वज फडकवून स्पर्धेतील सहभागी जि. प. अधिकारी व कर्मचाऱयांनी क्रीडाशपथ घेतली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक महादेव तांबडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत खोत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते. यावेळी मनोगत व्यक्त करताना जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले, अधिकारी व कर्मचारी खेळाडूंनी खिलाडूवृत्तीने स्पर्धा खेळावी. खिलाडूवृत्तीच तुमच्यात ईर्ष्याबरोबरच जिंकण्याचे सामर्थ्य निर्माण करेल. डॉ. खेमनार यांचेही भाषण झाले. 

दरम्यान, स्पर्धेच्या उद्घाटनानंतर संचलन करण्यात आले. यामध्ये जिल्हा परिषदेचे कृषि, लेखा व वित्त, आरोग्य, ग्रामीण विकास यंत्रणा, पशुसंवर्धन, बांधकाम, ग्रामपंचायत, पंचायत समिती, महिला व बाल कल्याण, शिक्षण विभाग आदींमधील अधिकारी, कर्मचारी सहभागी होते. पन्हाळा पंचायत समिती बहिरेवाडीचे कर्मचारी तर संचलनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराजासह मावळ्यांच्या आणि हातकणंगले पंचायत समितीचे कर्मचारी मल्हारी मार्तंडच्या वेशात सहभागी झाले होते. कर्मचारी अजित मगदूम लिखित तुमच्यासंग मला येवू द्या की…मलाबी खेळाला येवू द्या की.. या गाण्यावर धनगरी वेशभूषा केलेल्या कर्मचाऱयांनी नृत्याविष्कार करत संचलनात उत्साह भरला. तसेच वारकरी वेशभूषेत संचलनामध्ये सहभागी झालेल्या कर्मचाऱयांनी टाळ-मृदुंगासह हरिनामाचा जप करत संचलनात जाण आणली. तीन दिवस चालणाऱया या क्रीडा स्पर्धेचा बुधवारी (दि. 11) बक्षीस समारंभ आहे.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!