|Friday, July 28, 2017
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » टेंभुसाठी कोणतीही कसर ठेवणार नाहीटेंभुसाठी कोणतीही कसर ठेवणार नाही 

प्रतिनिधी/ आटपाडी

आटपाडीसह खानापूर विधानसभा मतदारसंघातील विकासकामांची पुर्तता करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न सुरू आहेत. टेंभु योजनेच्या उर्वरीत कामांना मार्गी लावताना शेतापर्यंत पाणी पोहचविण्यासाठी कटिबध्द आहेत. या कामात कोणतीही कसर ठेवणार नाही, असे प्रतिपादन आमदार अनिल बाबर यांनी केले.

आटपाडी तालुक्यातील झरे येथे आमदार फंडातून सनगर समाज सभागृहाच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. आमदार अनिल बाबर यांच्यासह तानाजीराव पाटील, ऍड.सर्जेराव खिलारी, नारायण चवरे, साहेबराव चवरे, धोंडीराम भोसले, भालचंद्र मेटकरी, सोपानराव माळवे, शामराव टिंगरे, बंडु कातुरे, दिलीप खिलारी रामचंद्र राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.

झरे येथे आमदार अनिल बाबर यांचे वाजत गाजत फटाक्यांची आतषबाजी करत कार्यकर्त्यांनी उत्साही स्वागत केले. झरे चौक ते मारूती मंदिरापर्यंत मिरवणुक काढुन जल्लोष करण्यात आला. यावेळी महिलांनी आमदारांसह प्रमुख मान्यवरांचे औक्षण केले. प्रा.साहेबराव चवरे यांनी स्वागत व प्रास्ताविकात आमदार अनिलभाऊंच्यामुळे विकासकामांना गती मिळाल्याचे सांगत प्रलंबीत प्रश्नांची सोडवणुक करण्याची मागणी केली.

टेंभु योजनेच्या डाव्या कालव्याची कामे पुर्णत्त्वास येवुन टेंभुचे पाणी सर्व भागाला देण्यासह आवर्तने निश्चित झाल्यास लोकांना लाभ होणार असल्याचे प्रा.साहेबराव चवरे यांनी स्पष्ट केले. कांता कातुरे, नारायण खिलारी, शरद खिलारी, सत्यजित चवरे, विक्रम मेटकरी, सुदर्शन राऊत, मारूती पाटील, वैभव कारंडे, विक्रम माने, पंढरी अर्जुन, नितीन अनुसे, प्रफुल्ल झाडे, जोतीराम सोळसे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!